Tarun Bharat

सातबारावर आमची नावे तातडीने दाखल करा

चिक्कहोळी येथील शेतकऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव

शेतकऱयांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता चिक्कहोळी (ता. सौंदत्ती) येथील 70 हून अधिक शेतकऱयांच्या उताऱयावर सरकारी जमीन म्हणून नोंद झाली. यामुळे शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिकाऱयांना विचारले असता तांत्रिक दोषामुळे हे घडले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यामुळे शेतकऱयांना कोणत्याच योजना मिळणे अशक्मय झाले असून तातडीने त्यांची नावे दाखल करावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

चिक्कहोळी येथील 300 हून अधिक एकर जमिनीचा उतारा काढल्यानंतर तसेच सर्व्हे करताना सरकारी जमीन म्हणूनच उतारा मिळत आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही जमीन आमच्याकडे आहे. वडिलांपासूनच ही जमीन कसत असून अचानकपणे सरकारी जमीन म्हणून नोंद झाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे.

एक तर शेतकऱयांना याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत किंवा नोटीसाही देण्यात आल्या नाहीत. असे असताना अचानकपणे नावे कमी होऊन सरकारी जमीन म्हणून ही नोंद झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही तहसीलदार तसेच इतर अधिकाऱयांची भेट घेत आहोत. ते दुरुस्त करतो असे सांगत आहेत. मात्र आजतागायत दुरुस्ती करण्यात आली नाही. तेंव्हा तातडीने आमची नावे पूर्वीसारखीच दाखल करावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चुन्नाप्पा पुजेरी, राघवेंद्र नाईक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा

Patil_p

आदी, दिशा, आरोही यांचे जलतरण स्पर्धेत यश

Omkar B

माहेश्वरी समाजाचा प्र-वर्गात समावेश करा

Amit Kulkarni

सुळगा (ये.) येथील घरे कोसळून नुकसान

Patil_p

मुतगा येथे शीर विरहित धड आढळल्याने खळबळ

Tousif Mujawar

सीबीटी बसस्थानकाचे काम युध्दपातळीवर

Patil_p