Tarun Bharat

सातवेसह नदीकाठच्या २३० गावांचा कुषीपंप वीजपुरवठा खंडित

Advertisements

९५ लाख थकबाकी; शेतकऱ्यांचे धाबे दणाणले

वारणानगर / प्रतिनिधी

पन्हाळा तालुक्यातील क. सातवे, बच्चे सावर्डे येथील वारणा नदीकाठच्या व इतर २३० शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा ९५ लाख रू. च्या थकबाकीपोटी वीज वितरण कंपनीने आज खंडित केल्याने शेतकऱ्यांचे धाबे आज दणाणले आहेत.

क. सातवे व बच्चे सावर्डे या दोन गावातील २३० शेतकऱ्याकडून विजवितरण कंपनीची ९५ लाख रुपये थकीत बिज बिल आहे. या शेतकऱ्यांना तोंडी सुचना वारंवार देऊन सुध्दा शेतकरी विज बिल भरण्यासाठी टाळाटाळ करत होते. काही शेतकऱ्यांना थकीत विज बिलातील हप्ते पाडून दिले होते यातील पहिला हप्ता भरला आहे.

पण राहिल्या ले विज बिलाची रक्कम भरण्यासाठी शेतकरी येत नाहीत त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी २३० शेतकऱ्यांचा कृषी पंपाचा विजपुरवठा बंद केला आहे असे सातवे विभागाचे कनिष्ठ अभियंता निलेश पवार यानी सांगितले. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असताना पिकांना वेळेत पाणी पुरवठा झाला नाही तर. पिके वाळण्याची शक्यता असल्याने या कारवाईमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

Related Stories

Kolhapur; ‘सीपीआर’ला हवीय ई-ऍम्ब्युलन्स.!

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासांत 51 नवे रूग्ण

Abhijeet Shinde

राधानगरी वनपर्यटनातून विकलांग विद्यार्थी झाले प्रफुल्लित

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ट्रकच्या धडकेत गडमुडशिंगीतील वृद्धा ठार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : न्यायालयाने पानसरे हत्या प्रकरणी अटक केलेल्या अंदूरे, कुरणे यांचा जामीन अर्ज फेटाळला

Abhijeet Shinde

गोकुळ : ‘जावयाचा ठेका गेल्यानेच त्यांना दु:ख’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!