Tarun Bharat

सातव्या टप्प्यासाठी आज पश्चिम बंगालमध्ये मतदान

Advertisements

कडेकोट सुरक्षा व्यवस्था, कोरोनासंबंधीही दक्षता 

कोलकाता / वृत्तसंस्था

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुच्या सातव्या टप्प्यासाठी आज सोमवारी मतदान होत आहे. या टप्प्यात 34 मतदारसंघांमध्ये मतदान होत असून यात 284 उमेदवारांचे भवितव्य 86 लाखांहून अधिक मतदार ठरविणार आहेत. मागच्या तीन टप्प्यांमधील हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता कडेकोट सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली असून कोरोनासंबंधी दक्षताही घेतली जात आहे.

या टप्प्यात एकंदर 12 हजार 68 मतदानकेंद्रांवर मतदान होईल. सुरक्षेसाठी केंद्रीय अर्धसैनिक दले आणि केंद्रीय राखीव पोलीस दलांच्या 796 तुकडय़ा नियुक्त करण्यात आल्या आहेत. ही मतदानकेंद्रे मुर्शिदाबाद, पश्चिम वर्धमान, दक्षिण दिनाजपूर, माल्दा आणि कोलकाता या जिल्हय़ांमध्ये आहेत. मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 अशी आहे. या टप्प्यातील अनेक मतदारसंघ शहरी भागांमध्ये आहेत. यंदा येथे भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल यांच्यात स्पर्धा असल्याचे बोलले जात असून डावे-काँगेस युती मागे पडल्याचे दिसून येते, असे मत अनेक अभ्यासकांनी व पत्रकारांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

मिशन स्कूल ऑफ एक्सीलेंसचा शुभारंभ

Amit Kulkarni

कुठलेच नाव नसणारे रेल्वेस्थानक

Patil_p

संस्कृतमध्ये मुस्लीम युवती अव्वल

Patil_p

16 जानेवारी हा दिवस ‘नॅशनल स्टार्टअप डे’ म्हणून साजरा होणार

datta jadhav

जम्मू-काश्मीर : सरकारी रुग्णालयातील इंटरनेट सेवा सुरू

prashant_c

पुणे-बेंगळूर मार्गावर साऊंडप्रुफ वॉल उभारा

datta jadhav
error: Content is protected !!