Tarun Bharat

सातारकरांनी अनुभवली उदयनराजेंची जिप्सी धूम

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

छत्रपती घराण्याचे थेट वंशज असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांचे व्यक्तीमत्व लगेच कळून येत आहे. त्यांचे मूडस, त्यांचे वागणे, चालणे आणि कॉलर उडवण्याच्या स्टाईलने ते तरुणाईवर गारुड करतात. छत्रपती म्हणून त्यांना उभा महाराष्ट्र मान देतो. त्यांचे बाईक आणि उंची कारचे वेडही सर्वांना ठावूक आहे. त्यांची जिप्सी कार त्यांचा खास ब्रँड असून त्याच जिप्सीमधून त्यांनी त्यांच्या अनोख्या स्टाईलमध्ये केलेली राईड सातारकरांसाठी खासच पर्वणी ठरली.

बुधवारी उदयनराजे त्यांच्या नेहमीच्या गाडीतून साताऱयातील औद्योगिक वसाहतीतील एका मोठय़ा कारच्या गॅरेजवर गेले. तिथे बहुदा त्यांची प्रिय असलेली जिप्सी मेंटेनेन्ससाठी टाकली होती. राजेंनी लाल टी शर्ट घातला होता. त्यांनी जिप्सीत एंट्री घेतली आणि मग तिथे चाहते त्यांचा व्हिडिओही घेवू लागले. मग राजेंनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने जादू की झप्पी दिली. जिप्सीतील गाण्यांच्या तालावर त्यांनी कारची रेस करुन तिची टेस्ट घेतली.

डोक्यात काळी टोपी, डोळय़ावर काळा गॉगल, लाल टी शर्ट आणि सोबतीला आवडती जिप्सी. त्यांचा वेगळाचा मूड उपस्थितींनी अनुभवला. आता राजे, खाली उतरतील आणि त्यांच्या गाडीतून निघून जातील अशी अपेक्षा असताना मात्र उदयनराजेंनी जिप्सी स्वतःच चालवत गॅरेजमधून बाहेर काढली. पुढे त्यांची काळय़ा रंगाची नेहमीची ओळख दाखवणारी उंची गाडी तर त्या पाठोपाठ एखाद्या हिरोप्रमाणे डोळय़ावर गॉगल चढवून सर्वांना हात करत निघालेल्या उदयनराजेंचे हे रुप त्यांचे चाहत्यांसह साताकरांना वेगळा आनंद देवून गेले.

Related Stories

कराड येथे दोन संशयित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

Archana Banage

शेंद्रनजिक ट्रक अपघातात दोन ठार

Patil_p

साताऱयात पेट्रोलिंग, रात्रगस्त वाढवणार

Patil_p

जायबंदी क्रिकेटपटूला भेटून जागवल्या जुन्या आठवणी

Patil_p

महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्पाचा गृहराज्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Patil_p

सातारा शहरात निसर्ग वादळाने उडाली त्रेधा

Patil_p
error: Content is protected !!