Tarun Bharat

सातारकर प्रेक्षकांना आणखीन पहावी लागणार वाट

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांमुळे बंद असलेल्या चित्रपट गृहे आत्ता पूर्णक्षमतेने सुरू करण्याची परवाणगी केंद्रसरकारने नुकतीच जाहीर केली असली, तरी साताऱयातील चित्रपटगृहे अद्याप बंदच आहेत. सध्या प्रेक्षकांचे मन जिंकेल असा दमदार चित्रपट नव्याने प्रदर्शीत करण्यास उपलब्ध नसल्याने अद्याप हे चित्रपट गृहे सुरू करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

 सध्या कित्तेक दमदार जुने चित्रपट आहेत, पण ते पुर्वीप्रमाणे पुन्हा प्रदर्शीत केल्यास प्रेक्षकवर्ग येणार नाही. कारण मोबाईलवर, इंटरनेटद्वारे प्रत्येकाला हव्या त्यावेळी कोणताही चित्रपट पहावयास मिळतो. त्यामुळे पुर्वीसारखे दिवस आता राहीले नाहीत. त्याचबरोबर सध्या हिंदी किंवा मराठी दमदार एकही चित्रपट प्रदर्शीत करण्यासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे उपलब्ध असलेला चित्रपट प्रदर्शीत केल्यास म्हणावा तसा प्रेक्षकवर्ग येणार नाही. पुन्हा चित्रपटाच्या देखभालीचा खर्च देखील त्यातून निघणार नाही.

 मागील वर्षभरापासुन चित्रपट गृहे ही बंदच होती. गेल्या काही महिन्या पूर्वी 50 टक्के प्रेक्षकांना चित्रपट गृहात एकावेळी चित्रपट पहाण्याची परवाणगी देण्यात आली होती. पण संपूर्ण राज्यात म्हणवा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. याचबरोबर कित्तेक नविन चित्रपटे चित्रपट गृहांसोबत ‘प्राईम व्हिडीओ’, ‘नेट फ्लीक्स’ सारख्या ऑनलाइन प्लाटफॉर्मवर एकाचवेळी प्रदर्शीत करण्यात आली. त्यामुळे कित्तेकांनी आपल्या मोबाईलवरच चित्रपटे पाहिली.

 त्याचबरोबर सध्या वेब सिरीजची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे युवा पिढी चित्रपटांपेक्षा नव्याने दाखल होणाऱया ‘तांडव’, ‘मिर्झापूर’, ‘बंदिश बँड’ सारख्या वेब सिरीजना पंसती देत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चित्रपट गृहांमध्ये चित्रपट पहाण्याची तरूणाईची संख्या कमी होते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 लॉकडाऊनमुळे मोठा फटका

 गेल्या वर्षभरापासुन चित्रपट गृहे बंद आहेत, त्यामुळे थियटर मालकांचे आतोनात नुकसान झाले आहे. आजुनही होतच आहे. त्यामुळे या थियटर मालकांनी हा व्यवसाय बंद करून दुसऱया अन्य व्यवसायाकडे वळावे की काय अशी मानसिकता निर्माण झाली आहे. कारण मागील वर्षभरापासुन चित्रपट गृहांच्या देखभालीचा खर्च व टॅक्सच मालक भरत आहेत. त्यांना नफा काहीच मिळाला नाही. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन कर सवलत द्यावी, अशी मागणी होत आहे.

 राजलक्ष्मी चित्रपट गृह मॅनेजर

 सध्या दमदार चित्रपट अद्याप उपलब्ध नसल्याने चित्रपट गृह अजुन बंदच आहे. येत्या 23 मार्च महिन्याच्या दरम्यान अक्षय कुमारचा ‘सुर्यवंशम’ चित्रपट सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरापासुन चित्रपट गृहे बंद असल्याने या विभागाचे आतोनात नुकसान झाले आहे.

Related Stories

सातारा : बोगस शेतकरी कर्ज प्रकरणाची मंत्री देसाई यांच्याकडे मांडली कैफियत

datta jadhav

हातकलंगलेमधील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 30 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Abhijeet Shinde

सातारा : आदर्की बुद्रुक येथे घरफोडी; २ लाखाचा मुद्देमाल लांबवला

Abhijeet Shinde

सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीसंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले “निर्णय बदलल्यास…”

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा दौऱ्यावर, पूरग्रस्त भागांना देणार भेट

Rohan_P

13 वर्षांपासून 119 पोलीस उपनिरीक्षक पदोन्नतीच्या प्रतिक्षेत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!