Tarun Bharat

सातारचा बाल लेखक अथर्वची जागतिक स्तरावर दखल

Advertisements

चंद्रकांत देवरुखकर/ सातारा

वयाच्या नवव्या 197 पानांची व वयाच्या दहाव्या वर्षी 427 पानांची अशी दोन पुस्तके लिहून जगभरातील लाखो वाचकांची पसंती मिळवणारा सातारचा पण सध्या टांझानियात रहात असलेला बाल लेखक अथर्व सचिन शिंदे याची सर्वात तरुण लेखक म्हणून इंटरनॅशनल बॅक ऑफ रेकार्डमध्ये नोंद झाली आहे. तर आशिया बुक ऑफ रेकॉर्डसने देखील त्याच्या कामगिरीची दखल घेत सर्वात तरुण वयात दीर्घ कांदबरी लिहिणारा लेखक म्हणून त्याची नोंद घेतली आहे.

2019 मध्ये ’दि बेहेमॉशस : एंड ऑफ वॉरब्रिंगर’ हे पुस्तक लिहून जगभरात नावारुपास आलेला सातारचा हा बाल लेखक अथर्व शिंदे हा साताऱयातील गोडोलीतील रहिवासी आहे. सध्या तो नेव्हीमध्ये कॅप्टन पदावर कार्यरत असलेल्या पिता कॅप्टन सचिन शिंदे यांच्यासमवेत आफ्रिकेतील टांझानियात वास्तव्यास असून तो विशाखापट्टणम येथील नेव्ही चिल्ड्रेन स्कूलमध्ये शिकत आहे. त्याच्या पहिल्यास पुस्तकास जगभरात वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ऍमेझॉन, फ्लिफकर्टवर त्याचे पुस्तक मोठय़ा प्रमाणावर खपले. त्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी 2020 मध्ये त्याने ’सेव्हिंग ऑलपंस’ हे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाला देखील जगभरातून वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

या दोन्ही पुस्तकांतील कथानक वाचकांना खिळवून ठेवणारे आहे. छोटय़ा मुलाच्या नजरेतून निर्माण झालेल्या ही कथानके अद्भूत होती. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉडर्सने त्याची वयाच्या 9 व्या वर्षी पुस्तक लिहणारा सर्वात तरुण लेखक व वयाच्या दहाव्या वर्षी दीर्घ पानांचे पुस्तक लिहणारा तरुण लेखक म्हणून त्याच्या कामगिरीची दखल घेतली आहे. त्याची ही दोन्ही पुस्तके ऍमेझॉनवर जगभरात उपलब्ध आहेत.  

इंडिया व आशिया बुक रेकॉर्डसने घेतली नोंद

इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉडर्सने भारताच्या या बाल लेखकाची सर्वात तरुण लेखक म्हणून दखल घेत त्याची नोंद घेतली असतानाच इंडिया बुक ऑफ रेकॉडर्स व आशिया बुक ऑफ रेकॉडर्समध्ये देखील सर्वात कमी वयात दीर्घ कांदबरी लिहणारा तरुण लेखक म्हणून त्याची नोंद झाली असून ही बाब सर्व सातारकरांसह देशासाठी अभिमानास्पद आहे.  

तिसरे पुस्तक तयार, चौथे लिहित आहे

अथर्व शिंदेच्या दोन पुस्तकांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याची जागतिक पातळीवर झालेले रेकॉर्ड हे त्याची बहीण गौरीच्या वाढदिवसाची भेट मिळाल्याची त्याची भावना आहे. त्याचे तिसरे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर असतानाच हा जगभरातील वाचकांचा आवडता बाल लेखक अथर्व शिंदे सध्या चौथे पुस्तक लिहित असल्याचे त्याचे वडील सचिन शिंदे यांनी सांगितले. तर त्याच्या या यशाने आम्हांला खूप आनंद झाला असल्याची भावना त्याचे साताऱयातील गोडोली येथे वास्तव्यास असलेले आजोबा विजय शिंदे यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना व्यक्त केली.

Related Stories

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका! काटेकोर नियोजन करा : मुख्यमंत्री

Tousif Mujawar

राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला

datta jadhav

जॅकलीनची परदेशात जाण्यासाठी कोर्टात धाव

Abhijeet Khandekar

सातारा : दुचाकी चोरी, दरोडा व अपहरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

Archana Banage

“मनसुख हिरेनच्या हत्येमागे सचिन वाझेचाच हात”

Archana Banage

मुंबई : सोने तस्करीप्रकरणी 18 केनियन महिला ताब्यात

datta jadhav
error: Content is protected !!