Tarun Bharat

सातारचे सुपुत्र प्रविण पवार यांना ‘केंद्रीय जीवन रक्षक’पुरस्कार

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) मधील कार्यरत सातारचे प्रविण अशोक पवार यांच्या त्यांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्री यांचा मानाचा मानला जाणारा ‘केंद्रीय जीवन रक्षक’ पुरस्काराने नुकताच जाहिर झाला आहे. त्यांना एक लाख रूपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सध्या ते पोलिस सबइनिस्पेक्टर म्हणून केरळ येथे कार्यरत आहेत.

 प्रविण हे मुळचे मांडवे व सध्या गोळीबार मैदान साताराचे रहिवासी असुन त्यांनी 7 ऑगस्ट 2020 मध्ये दुबई-कोझिकोड या एअर इंडिया च्या विमानाच्या अपघातातील बचाव कार्यात आपल्या जीवाची परवा न करता आपले कर्तव्य बजावत त्यांनी अपघातात जखमींना वाचवले व अतुल्य असे शौर्य आणि साहसाचे प्रदर्शन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना सदरच्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 प्रविण यांचे शालेय शिक्षण सातारा येथे व महाविद्यालयीन शिक्षण एल.बी.एस महाविद्यालयात झाले. त्यांनी बेंगलोर व केरळ येथे सेवा बजाविली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ही सातारा ते कारगिल हा सायकल वरून प्रवास केला होता. लहान पणापासुनच त्यांचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते. त्यांची वडील ही सैन्यात कार्यरत होते. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे व पवार कुटुंबियांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

Related Stories

सोने-चांदी दरात पुन्हा वाढ

Patil_p

दरीत अडकलेल्या युवकाला अखेर जीवदान

Patil_p

थंडीमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ

datta jadhav

सातारा पालिकेचे दोन कर्मचारी लाच घेताना जाळ्यात

Patil_p

आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षण वैधतेवर १३ सप्टेंबरपासून सुनावणी

Archana Banage

Kolhapur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या- स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!