Tarun Bharat

सातारच्या मुख्याधिकारीपदी रंजना गगे

प्रतिनिधी/ सातारा

राज्यात कोठेही काम करण्यापेक्षा सातारा पालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम करणे अवघड असते.आजपर्यंत झालेल्या प्रत्येक मुख्याधिकाऱयांना त्याचे अनुभव आले आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी पालिकेचा कारभार चार वर्षे 1 महिने पाहिला असून दि. 6 रोजी उशिरा त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी अकोला महानगरपालिकेच्या उपायुक्त रंजना गगे यांची बदली झाली आहे. पालिकेच्या इतिहासात महिला मुख्याधिकारी म्हणून त्या दुसऱया आहेत. सातारा पालिकेचा गाडा चालवताना त्या योग्य ती घडी बसवणार का?, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. 

 दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यलयातील नगरपालिका प्रशासन अधिकारी रवी पवार यांची लोणावळा येथे बदली झाली तर त्यांच्या जागी सचिन पवार हे आले आहेत.

पालिकेत मुख्याधिकारी किंवा कोणताही अधिकारी म्हणून काम करताना अनेक अडचणी येतात. आजपर्यंत कार्यरत असलेल्या अधिकाऱयांनी त्याचा अनुभव घेतला असल्याने परत सातारा नकोच अशी कायम आठवण त्या अधिकाऱयांना राहते. सत्ताधारी, विरोधक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांचा सतत त्रास काम करताना होत असतो.

अनेक प्रकल्प मार्गी लागले

मुख्याधिकारी शंकर गोरे हे चार वर्षे एक महिना एवढा कालावधी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे प्रकल्पाची कामे सुरू झाली. दरम्यान, त्यांच्या जागी अकोला महानगरपालिकेच्या उपायुक्त रंजना गगे यांची नियुक्ती झाली आहे. त्या पालिकेच्या दुसऱया महिला मुख्याधिकारी आहेत.त्या मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत.

Related Stories

किल्ले वसंतगडवरील ढासळलेल्या ‘त्या’ बुरूजाचे संवर्धन होणार

Patil_p

साताऱ्याला मी अवश्य भेट देईन; राष्ट्रपती मुर्मूंचे आश्वासन

Archana Banage

चिंधवली शाळेत घुमतोय तंबाखूमुक्तीचा गजर

Archana Banage

संभाजीराजेंनी घेतली शिवेंद्रसिंहराजेंची साताऱ्यात भेट; चर्चांना उधाण

Archana Banage

बारामतीच्या घनश्याम केळकरांचे चार हजार किलोमीटरचे पायी भ्रमण

Patil_p

साताऱयात पुन्हा धूमस्टाईलने मंगळसूत्र हिसकावले

Patil_p