Tarun Bharat

सातारच्या सृष्टीची राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेत चमक

प्रतिनिधी/ सातारा

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने सोनिपत (हरियाणा) येथे सुरू असलेल्या चौथ्या ज्युनिअर मुलींच्या राष्ट्रीय बॅक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना सातारा जिल्हय़ाची राष्ट्रीय खेळाडू सृष्टी सुनिलकुमार रासकर हिने कास्य पदक पटकाविले आहे. तिच्या या यशामुळे सारातच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 तसेच या यशामुळे सृष्टीची ज्युनिअर एशियन चॅम्पियशीप सराव शिबिरासाठी निवड झाली आहे. सोनिपत येथे या स्पर्धा दि. 26 जुलै रोजी पार पडल्या सातारच्या सृष्टीने आसामच्या खेळाडूला चितपट करून पुढील प्री कॉर्टर सामन्यात तिने उत्तर प्रशेशच्या स्पर्धकाला हरवुन कॉर्टर फायनलमध्ये प्रवेश केला. त्यात तिने हिमाचल स्पर्धकाला हरवुन आपले पदक निश्चित केले.

 सृष्टी ही मुळची कोरोगाव तालुक्यातील भोसे येथील रहिवासी असुन तिचे वडील आगारातील वाहन चालक आहेत. ती येथील सरस्वती विद्यालयाची इयत्ता 10 वी ची विद्यार्थीनी आहे. ती मागील तीन वर्षे सातारा बॉक्सिंग ऍकॅडमीत आंतराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप यांच्याकडे नियमित सराव करीत आहे. सृष्टीच्या या यशाबद्दल तिचे सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, विभागीय सचिव योगेश मुंदडा, ऍकॅडमीचे पदाधिकारी हरिष शेट्टी, रवींद्र होले, संजय पवार, अमर मोकाशी, बापूसाहेब पोतेकर आदी पदाधिकाऱयांसह ग्रामस्थांनी तिचे कौतुक केले आहे.

Related Stories

फलटण सभापतींच्या घरातून चोरी

Patil_p

कणसे मळा अपघातातील आणखी एका जखमीचा मृत्यू

Patil_p

लसीचा दुसरा डोस 30 दिवसांत का घेतला, यावर राजेश टोपेंनी दिले स्पष्टीकरण

Archana Banage

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भाविकाविनाच पार पडला दक्षिणद्वार सोहळा

Archana Banage

का बंद करण्यात आला पोलिसांचा निशुल्क प्रवास?

datta jadhav

जिवंत बॉम्बचे स्थानिक कनेक्शन?

Amit Kulkarni