Tarun Bharat

सातारच्या ‘हिरकणी’ने नोंदवला अनोखा विक्रम

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

शिवज्योत हाती घेवून किल्ले राजगड ते किल्ले अजिंक्यतारा असा 111 किलोमीटरचा प्रवास नववारी साडी नेसून सातारच्या हिरकणी फौंडेशनच्या सदस्या डॉ. शुभांगी गायकवाड यांनी शिवजयंती दिवशी पूर्ण केला. या विक्रमाच्या माध्यमातून गडसंर्वधन आणि महिला आरोग्य याकडे लक्ष केंद्रीत करा, असा संदेश त्यांनी दिला. 

  सातारच्या डॉ. शुंभागी गायकवाड या हिरकणी फौंडेशनच्या माध्यमातून गडसंर्वधनाचे काम करत आहेत. या गडसंवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन करत किल्ले राजगड येथून नववारी साडी नेसून त्यांनी शिवज्योत हाती घेतली. त्यांनी तब्बल 111 किलोमीटर हे अंतर धावत पार करायला सुरूवात झाली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गुरूवारी राजगडावरून जोशीविहीर असे 12 तासांत 74 किलोमीटर अंतर त्यांनी पार केले. यांची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉडमध्ये झाली आहे. पेटती शिवज्योत, शिवप्रेमी, धावपटु महिला, तरुण त्यांचा उत्साह वाढवत होते. हे अंतर पार केल्यानंतर शिवजयंती दिवशी त्या किल्ले अजिंक्यतारा येथे पोहोचल्या. राजसदरावर शिवज्योतीची पुजा केली. त्याचे आगमन होताच सर्व शिवप्रेमींनी टाळयाच्या गजरात त्यांचे स्वागत केले. जय जिजाऊ जय शिवराय असा घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या या कामगिरीमुळे सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला.  

महिलांच्या आरोग्यासाठी धावले…

महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा उद्देशही या विप्रमाचा होता. महिलांना आरोग्याकडे लक्ष देत व्यायाम ही करणे गरजेचे आहे. तर त्यांचे आजार बरे होतील. मी करू शकते. तर प्रत्येक महिला करू शकते. यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे मार्गदर्शन मी आजच्या या विक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकीला करत आहे.

                 डॉ. शुंभागी गायकवाड

                 हिरकणी फौंडेशन, सदस्या

Related Stories

जिल्हय़ात 5 कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

हुबळीत भीषण अपघातात ८ ठार, मृत्यूमधील ६ जण कोल्हापुरातील?

Rahul Gadkar

कणसे मळा अपघातातील आणखी एका जखमीचा मृत्यू

Patil_p

समता संस्थेने थोपटली कर्मचाऱयांची पाठ

Patil_p

महाराष्ट्रासह मुंबईचे आर्थिक महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव : जयंत पाटील

Archana Banage

‘भाजपाच्या ‘या’ निर्णयामुळे देशात कोरोनाची दुसरी लाट’

Archana Banage
error: Content is protected !!