Tarun Bharat

सातारयात 46 नागरिकांना आज डिस्चार्ज , 340 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Advertisements

सातारा / प्रतिनिधी

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 46 जणांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे तसेच फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथील कोरोना बाधिताचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये कराड तालुक्यातील खुबी येथील 19 वर्षीय युवक, उंब्रज येथील 43 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 40, 20, 65 वर्षीय महिला, 12 मुलगी, 8 वर्षाचा बालक व 34 वर्षीय पुरुष, मसूर येथील 10 वर्षीय बालक, 50 वर्षीय महिला, 56, 27 व 23 वर्षीय पुरुष, मालखेड येथील 60 वर्षीय पुरुष, येलगाव येथील 47 वर्षीय पुरुष, तारुख येथील 56 वर्षीय पुरुष, खंडोबानगर, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, पाटीलवाडी (म्हासोली) येथील 48 वर्षीय महिला
पाटण तालुक्यातील सितापवाडी येथील 60 व 28 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, कर्टे येथील 49 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष
जावली तालुक्यातील रामवाडी येथील 48, 26, 22, 40 व 18 वर्षीय महिला, 33, 30, 16 व 38 वर्षीय पुरुष व 1 वर्षाचा बालक,
पिंपळवाडी येथील 45 वर्षीय पुरुष
खंडाळा तालुक्यातील शहाजी चौक शिरवळ येथील 20 व 42 वर्षीय पुरुष
माण तालुक्यातील खंडेवाडी (वारुडगड) येथील 33 वर्षीय पुरुष
सातारा तालुक्यातील जिहे येथील 50 वर्षीय पुरुष, दहिवडी (रोहोट) येथील 28 वर्षीय पुरुष, आर्वे येथील 55 वर्षीय पुरुष
कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील 28 व 26 वर्षीय पुरुष, किरोली येथील 26 व 28 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 39 वर्षीय पुरुष
खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 60 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 27, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 67, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 40, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 31, वाई येथील 23, शिरवळ येथील 72, रायगाव येथील 11, पानमळेवाडी येथील 26, मायणी येथील 16, खावली येथील 27 असे एकूण 340 जणांचे घशातील नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

तर क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे फडतरवाडी ता. फलटण येथील 42 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारदरम्यान आज सकाळी मृत्यु झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

Related Stories

सातारा : नागठाणे काॅलेजच्या दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

datta jadhav

जनतेच्या समस्या सोडवणे नगरसेवकांचे कर्तव्य-शिवेंद्रराजे भोसले

Abhijeet Khandekar

शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यासाठी दबावगटाची गरज : राजू शेट्टी

Patil_p

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा सातशे पार

Abhijeet Shinde

सांगली : कुंडल येथे मृतावस्थेत आढळले तीन नाग, तस्करीची शक्यता

Abhijeet Shinde

कोरोनामुक्त चार हजार पार : २९० नवे रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!