Tarun Bharat

सातारा,कराडमध्ये पुजा साहित्यांच्या दुकानांवर धाडी

वनविभागाच्या कारवाईने खळबळ

प्रतिनिधी/ सातारा

सातारा वन विभागाने सातारा व कराड शहरातील विविध ठिकाणी पुजेचे साहित्य दुकानावर धाड टाकून 70 इंद्रजाल, काळे कोरल, चंदनाचे सुमारे 80 किलो तुकडे, 600 मोरपिसे व वन्यजीवांचे अवशेष जप्त केले आहेत. या कारवाईने एकच खळबळ उडाली असून वनविभागाने सातारा व कराड येथील पाचजणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    उपवनसंरक्षक मोहिते यांनी सांगितले की, सातारा येथील सदाशिव पेठेत असणाऱया श्री. दत्त पूजा भांडार या दुकानातून इंद्रजाल कोरल नावाच्या समुद्री प्राण्याचे मृत अवशेष, व इतर साहित्य पृथकरण करताना आढळून आल्याने संबंधित दुकानदार आरोपी संतोष घोणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दुकानातून 59 इंद्रजाल कोरल मिळून आले असून त्याबरोबर चंदनाचे सुमारे 80 किलो तुकडे, 600 मोरपिसे मिळून आले आहेत. आरोपी घोणे याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे.

  सदाशिव पेठेतील पंचमुखी पूजा साहित्य दुकानात धाड टाकून आरोपी दुकानदार दत्तात्रय सदाशिव धुरपे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 8.5 किलो वजनाचे चंदनाचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत. कोटेश्वर पूजा साहित्य, शाहू स्टेडियम याठिकाणी टाकलेल्या धाडीत आरोपी राहूल विजय निकम याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याच्या दुकानातून हत्ताजोडी या घोरपड या वन्य प्राण्याच्या शरीराचा भाग असलेल्या 9 अवशेष व मोरपिसे मिळून आले आहेत.

   दरम्यान, कराड येथील विजय बाबूराव धावडे अँड सन्स आणि प्रशांत जनरल अँड पूजा भंडार या ठिकाणी धाड टाकली असता इंद्रजाल कोरल नावाच्या समुद्री प्राण्याचे मृत अवशेष व इतर प्रतिबंधित वन्य प्राणी वस्तू विक्री करताना आढळून आले. या दोन्ही दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विजय बाबूराव धावडे अँड सन्स या दुकानातून 11 इंद्रजाल (काळे कोरल), 7 हत्ती जोडी नग, साळशिंग या कोल्हा सदृश्य या प्राण्याच्या कातडय़ापासून बनवलेले 6 नग हस्तगत करण्यात आले आहेत. तर प्रशांत जनरल अँड पूजा भंडार या दुकानातून प्रवीण प्रकाश देशमुख याला अटक केली असून त्याच्याकडून इंद्रजाल कोरल 8 नग, घोरपड या प्राण्यांच्या शरीराचा भाग असलेले 11 हत्ती जोडी नग आदी साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी विजय बाबूराव धावडे याला अटक करण्यात आली आहे.

  या कारवाईत वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, वनपाल पावरा, प्रशांत पडवळ, सुहास भोसले, साधना राठोड, राज मुसलगे, सूर्याजी ठोंबरे, संतोष दळवी यांनी सहभाग घेतला.

Related Stories

दहावी-बारावी परीक्षा आता जुन्याच पद्धतीने

datta jadhav

पुष्पवृष्टी करून उमेद कडून आशा व अंगणवाडी सेविकांचा सन्मान

Archana Banage

रयत शिक्षण संस्था देशाचे भूषण

datta jadhav

अन्नछत्राच्यावतीने शिवभोजन थाळी पुन्हा सुरू, संचारबंदीत रुग्ण, फिरस्ते, पोलिसांच्या पोटाला आधार

Archana Banage

एकही बालक पोलिओ लसीपासून वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी

Archana Banage

कोरोना पार्श्वभूमीवर कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान

Archana Banage