Tarun Bharat

सातारा : अंडी उधार न दिल्याच्या रागातून दुकानदाराचा खून

ऑनलाईन टीम / सातारा : 

अंडी उधार न दिल्याच्या रागातून साताऱ्यातील यवतेश्वर पॉवर हाऊस जवळ एका दुकानदाराची हत्या करण्यात आली आहे. 

बबन हणमंत गोखले (वय 42) असे खून झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. खून प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोखले यांचे यवतेश्वर पॉवर हाऊस जवळ किराणा मालाचे दुकान आहे.शुभम कदम आणि सचिन माळवे यांनी दुकानात जाऊन गोखले यांना अंडी उधार देण्याची मागणी केली. पण, गोखले यांनी अंडी उधार देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्याभरात कदम आणि माळवे यांनी गोखले यांची दगड आणि धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Stories

पंतप्रधानांना पोस्टाने पाठवल्या शेणाच्या गोवऱ्या

datta jadhav

सातारा : डायलिसिस अभावी गोडोलीतल्या कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

Archana Banage

शिवाजी विद्यापीठातर्फे 50 गुणांची मॉकटेस्ट आजपासून

Archana Banage

धुक्यात हरवला सातारा

datta jadhav

आज मध्यरात्रीपासून सातारा विभागातील एसटी कर्मचारी संपावर

datta jadhav

महाबळेश्वर पर्यटन विकासासाठी ३३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

Archana Banage