Tarun Bharat

सातारा : अकरावी प्रवेशावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळा अन्यथा कारवाई

प्रतिनिधी / सातारा

दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया सातारा जिल्ह्यात सुरू झाली आहे. ही प्रक्रिया करत असताना प्राचार्यांनी नियम पाळणे गरजेचे आहे. आपल्या महाविद्यालयात संसर्ग होऊ नये याची पुरेपूर काळजी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तसा प्रकार आढळून आल्यास महाविद्यालयावर कारवाई करण्यात येईल असा इशारा माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. तसे पत्र जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिले आहे.

जिल्ह्यातील महाविद्यालयात 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश घेण्यासाठी कोरोनाचे वाढते प्रस्त असताना ही विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरात येत आहेत. मिळेल ते वाहन करून महाविद्यालयाच्या परिसरात येताच त्यांना गर्दी दिसत आहे. प्रवेश घेण्यासाठी धोका दिसत असून ही गर्दीत सहभागी व्हावे लागते. मग झेरॉक्स सेंटर वर गर्दी, ऑन लाईन अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेत गर्दी दिसत आहे. त्या गर्दीच्या तक्रारी शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्याकडे झाल्या आहेत. त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र काढले आहे. त्या पत्रात दि.29रोजी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झालेला आहे. तरी सर्व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी इयत्ता ११ वी प्रवेश सन २०२०-२०२१ या शैक्षणिक

वर्षातील प्रवेश प्रक्रिये बाबत कार्यवाही करावी. सुचनांचे पालन करावे.सदयस्थितीत कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थितीने सर्व नियम प्रवेशाच्यावेळी पाळण्यात यावे. त्या अनुषंगाने प्रवेश प्रक्रियेसाठी शक्य असल्यास कनिष्ठ महाविद्यालय स्तरांवर ऑनलाईन प्रवेश पध्दतीचा वापर करावा. त्या दृष्टीने नियोजन करावे. ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरुन घ्यावा त्यानुसार त्याची कागदपत्रे घेवून प्रवेश निश्चित करावा. इयत्ता ११ वी प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिक शुल्क ऑनलाईन माध्यमाव्दारे भरण्याची सुविद्या उपलब्ध करुन देण्यात यावी. ज्या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश देणे शक्य नाही तेथे अंतराचा निकर्ष व शासनाने कोविड-१९ बाबत दिलेले निकष पाळून टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना बोलावून प्रवेश प्रक्रिया पार पाडावी. प्रवेश प्रक्रियेवेळी महाविद्यालयामध्ये गर्दी होणार नाही या बाबत दक्षता घेण्यात यावी. ऑफलाईन प्रवेश प्रक्रीया राबविणा-या कनिष्ठ महाविद्यालयानी अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी
गर्दी होणार नाही या दृष्टीने जास्तीत जास्त काऊंटर उघडावेत.

तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी.अनुदानित तुकडयातील वाढीव विद्यार्थी क्षमता पुर्ण झाल्यानंतर क्रमाने विनाअनुदानित तुकडयामधील प्रवेश क्षमता पुर्ण करावी. इयत्ता ११ वी प्रवेश देताना मंजूर क्षमतेपेक्षा जादा प्रवेश देण्यात येवू नयेत जेणेकरुन मंजूर तुकडयांवर अनिष्ट परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी. मान्यता प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयारी कोणत्याही खाजगी क्लासेस बरोबर टायअप असता कामा नये अशी बाब निदर्शनास आल्यास त्या कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्या बाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येईल. असा इशारा दिला आहे.

Related Stories

अजिंक्यताऱयावरील ‘रोप वे’ची लवकरच उभारणी

Patil_p

कास धरणाचे रखडलेले काम लवकरच होणार सुरु

Patil_p

रुग्णालयाच्या दारातच बाधिताने सोडला जीव

Patil_p

सातारा : आज 181 नागरिक झाले कोरोनामुक्त तर 57 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage

सातारा : बावधन ओढा येथे कार-दुचाकी अपघातात दोन जखमी

datta jadhav

लक्ष्मी टेकडी परिसरातही डेंग्यू, चिकुन गुनियाच?

Patil_p
error: Content is protected !!