Tarun Bharat

सातारा : अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाची पालिकेसमोर निदर्शने

सातारा / प्रतिनिधी :

कोरोना काळात केलेल्या कामांचा पालिका कर्ममचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, या मागणीसाठी पालिकेच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करत अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. तसेच नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यासोबत चर्चा शिष्टमंडळाने केली.

संघटनेचे चंद्रकांत खंडाईत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोनाच्या काळात पालिका कर्मचाऱ्यांनी मेहनतीने काम केले आहे. जीवाची पर्वा न करता काम केले आहे. महाराष्ट्र नगरविकास विभागाच्या परिपत्रकानुसार जोखीम पत्करुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतनाव्यतिरिक्त एक हजार रुपये प्रोत्साहनपर अदा करुन त्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढला गेला. कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

जिल्हय़ाची रूग्णवाढ सहाशेवर स्थिर

Patil_p

अर्णिका गुजर भारतीय बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक

Patil_p

तिजोरीतील खडखडाटाने पालिकेत बचतीचे धोरण

Amit Kulkarni

1जून पासुन सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन त्वरीत रद्द करावा

Patil_p

सहकार भारतीचे उपक्रम सहकारी संस्थांसाठी उपयुक्त : अनंतराव जोशी

Archana Banage

येलमरवाडी खूनप्रकरणी दोघांना दि. 17 पर्यंत पोलीस कोठडी

Patil_p