Tarun Bharat

सातारा : अतीत येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

Advertisements

१.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ६ जण ताब्यात

प्रतिनिधी / नागठाणे

अतीत (ता.सातारा) येथे सुरू असलेल्या चोरट्या जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी धाड टाकून सहाजणांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून सुमारे १.८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

अतीत गावात बेघरवस्तीमध्ये गुलाबराव सखाराम कारंडे यांच्या घराच्या बाजूला काही इसम पैश्यावर तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची बातमी सपोनि डॉ.सागर वाघ यांना समजली.दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सपोनि डॉ.सागर वाघ, हवालदार बाबा महाडिक,विजय साळुंखे,उत्तम गायकवाड,विशाल जाधव व राहुल भोये यांनी येथे छापा टाकला.

यावेळी पोलिसांनी तेथून तीन पानी जुगार खेळत असताना गणेश गुलाबराव कारंडे (वय.३८),महेश राजेंद्र काळे (वय.३१,बाळकृष्ण कोंडीबा सुतार (वय.४५),अशोक दगडू काळे ( वय.४०), युवराज आनंदा कुदळे (वय.४०,सर्व रा.अतीत,ता.सातारा) व संजय सर्जेराव जाधव (वय.५२,रा.माजगाव,ता.सातारा) यांना ताब्यात घेतले.पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम ,एक बुलेट,एक हिरो कंपनीची दुचाकी व सहा मोबाईल असा १.८९ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून घटनेचा पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.

Related Stories

15 ऑगस्टला ग्रामसभा होणार की नाही ?

Patil_p

जावली तालुक्यात कोरोनाची अँन्टीजेन टेस्ट सुविधा उपलब्ध

Patil_p

हडपसर, पुणे येथून आलेल्या मृत व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह

Archana Banage

सातारा : ग्रामपंचायत मतदानामुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट

datta jadhav

दिवाळीच्या साहित्यांनी सजली बाजारपेठ

Patil_p

सलग दुसऱ्या दिवशी बाधित वाढ घटली

datta jadhav
error: Content is protected !!