सातारा / प्रतिनिधी:
बदेवाडी गावच्या हद्दीत दि.15 रोजी दुचाकीचा अपघात झाला होता. त्या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यावरून दुचाकी चालकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दि.15 रोजी रात्री 8 च्या सुमारास एम एच 11 सी व्ही 3384 या बुलेटवरून दोघे निघाले होते. दुचाकी चालकाचा गॉगल पडल्याने दुचाकी लटपटली.पाठीमागे बसलेले चिन्मय राणा (रा.पश्चिम बंगाल )हे जखमी झाले.त्यांना उपचारासाठी नेले होते परंतु उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यावरून संग्राम परमेश्वर भोसले यांनी दुचाकी चालक संदीप हणमंत भोसले याच्यावर भा. द.वि. स.279,38,184नुसार गुन्हा दाखल केला आहे. हवालदार तोरडमल तपास करत आहेत.

