Tarun Bharat

सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस

Advertisements

लोणंद / प्रतिनिधी

दोन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका मंदिरातच 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना खंडाळा तालुक्यातील एका गावात घडली होती . याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील एका गावातील बारा वर्षांची मुलगी 9 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दुकानात जात होती. त्यावेळी त्याच गावातील एका तरुणाने तिला बोलावून घेतले. मुलीला धमकी देऊन जवळच असलेल्या मंदिरात नेले. त्यानंतर तिच्यावर त्याने जबरदस्तीने अत्याचार केला. ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला मारून टाकीन. तसेच तुझ्या घरच्यांना पण मारून टाकीन, अशी धमकी त्या तरुणाने दिली. त्यामुळे पीडित मुलीने हा प्रकार भीतीपोटी कोणालाही सांगितला नाही.

काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी तिच्या मामीकडे गेली होती. त्यावेळी तिने हा सारा प्रकार मामीला सांगितला. त्यानंतर मामीने फोनवरून मुलीच्या आईला या प्रकाराची माहिती दिली. मुलीच्या आईने तातडीने लोणंद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी संबंधित तरुणावर अत्याचार केल्याचा तर अत्याचाराची घटना घडली त्याच दिवशी संशयित आरोपी तरुणाच्या वडिलानेही मुलीला ‘तू माझ्या मुलासोबत लग्न कर, अन्यथा तुझ्या वडिलांना व तुझ्या घरातील लोकांना मारून टाकीन, ‘ अशी धमकी दिली. त्यामुळे त्याच्या वडिलांवर धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. दोघेही बापलेक पोलिसांना सापडले नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने हे अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

“…तर मी स्वत: लोकांसमोर फासावर जाईन”

Abhijeet Shinde

‘जयहिंद’च्या सचिव, लिपिकाला तालुका उपनिबंधकांचा दणका

Abhijeet Shinde

केंद्र सरकार करणार 13 एअरपोर्ट्सची विक्री

datta jadhav

सांगली : बागणीत सापडला दुर्मिळ हेलिकॉप्टर मासा

Abhijeet Shinde

दिल्लीत आजपासून 45 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी ‘जहां वोट, वहां वैक्सिनेशन’ अभियान

Rohan_P

मिरजेत २०० जणांच्या अँटीजन चाचणीत दोघे कोरोनाबाधित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!