Tarun Bharat

सातारा : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

Advertisements

प्रतिनिधी / नागठाणे :

वर्णे(ता.सातारा) येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांनी हि फिर्याद दाखल केली आहे.

बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्णे येथील अल्पवयीन मुलगी ही लहानपणापासून तिच्या आजोळी कोपर्डे (ता.सातारा) येथे राहत होती.सोमवारी सकाळी मुलीला घरी वर्णे येथे यावयाचे असल्याने तिला कोपर्डे येथून भावाने एसटी बस मध्ये बसवुन दिले.मुलीला बसमध्ये बसवून दिल्याची माहिती त्याने फोनवर वर्णे येथे दिली.मात्र सायंकाळ झाली तरी मुलगी वर्णे येथे न आल्याने नातेवाईकांनी कोपर्डे व वर्णे परिसरात शोध घेतला. मात्र ती मिळून न आल्याने मंगळवारी रात्री उशिरा बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला.या घटनेचा पुढील तपास साहाय्यक फौजदार बाजीराव पायमल करत आहेत.

Related Stories

कोकणातील मगरींच्या गावात निसर्ग पर्यटन बोट सफारी!

Patil_p

महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

datta jadhav

मोकाट कुत्र्यांचा चिमुरडीवर हल्ला

Patil_p

जिल्हा परिषदेवर प्रशासकराज

Patil_p

आरटीओ कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा

Archana Banage

आता तरी सावध व्हा,आणि खटाव तालुक्यात कोरोना झपाटय़ाने वाढत आहे,

Patil_p
error: Content is protected !!