Tarun Bharat

सातारा : आज-उद्या पाणी पुरवठा कपात

Advertisements

शाहूपुरी : सातारा नगरपरिषदेच्या ज्या भागातील नागरिकांना शहापूर योजना (उरमोडो नदी उदभव) या योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. या सर्व नागरिकांना आज (दि.११) दुपारी १२ वाजेपासून  शनिवारी (दि.१२) सकाळी ८ वाजेपर्यंत शहापूर योजनेच्या मेन्टेनन्सचे काम करणेत येणार आहे. तसेच ४५०mm व्यासच्या रायझिंग मेन च्या लिकेजचे काम करण्यात येणार आहे. परिणामी शहापूर केटी वेअर उपसा केंद्र बंद राहणार आहे. त्यामुळे शहापूर माध्यमातील गणेश टाकी, राजवाडा टाकी, गुरुवार टाकी, बुधवार नाका टाकी, घोरपडे टाकी व यशवंत गार्डन टाकी या टाक्यांवर अवलंबून असणारा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.     

त्यामुळे शहरातील शहापूर माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या नागरिकांना शुक्रवार दि.१४ रोजी दुपारी सत्रातील घोरपडे टाकी पंपिंग लाईन ,चार भिंती ते कूपर कारखाना अखेर डोंगरावरील सर्व भाग तसेच कुंभारवाडा परिसर, यशवंत टाकी माध्यमातील रविवार पेठ, लोणार गल्ली पोवई नाका परिसर, यशवंत गार्डन टाकी माध्यमातून सायंकाळ सत्रातील होणारा पाणीपुरवठा मल्हार पेठ, ५०१ पाटी परिसर या भागात शुक्रवार दि.१५ रोजी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच शनिवार दि.१२ रोजी सकाळ सत्रातील शहापूर माध्यमातील गणेश टाकी, घोरपडे टाकी, बुधवार नाका टाकी, राजवाडा टाकी, यात गार्डन टाकी या टाक्यांच्या माध्यमातून शहापूर योजनेतून होणारा पाणीपुरवठा पाणी उपसा केंद्र बंद असल्याने होऊ शकणार नाही.

यामध्ये प्रामुख्याने बुधवार पेठ, शनिवार पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठमधील काही भाग, यादोगोपाळ पेठ, केसरकर पेठ,  दुर्गा पेठ, गुरुवार पेठ, राजवाडा परिसर, फुटका तलाव परिसर, कमनी हौद परिसर, वाघाची नळी परीसर, पंचपाळी होद परिसर, महात चौक परिसर, शुक्रवार पेठ कही भाग, सदाशिव पेठ, बुधवार पेठ काही भाग, भवानी पेठ या परिसरात सकाळ सत्रातील पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. शहापूर माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती  यशोधन नारकर , मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.

Related Stories

सातारा : ओझर्डेतील जवानाला सिक्कीममध्ये वीरमरण

datta jadhav

कोरोनाबाधित जि.प. कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी विशेष समित्या स्थापन

datta jadhav

सातारा : विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करा; मंत्री देसाई यांचे पोलिसांना आदेश

datta jadhav

सातारा हद्दवाढ प्रस्तावास मंजुरी, सर्वत्र आनंदाचे वातावरण

Abhijeet Shinde

सुरक्षेच्या कारणास्तव मुद्रांक विक्री आठ दिवस बंद

Abhijeet Shinde

बाधित वाढीचा वेग कायम : 2,364 बाधित

datta jadhav
error: Content is protected !!