Tarun Bharat

सातारा : आयआरके सिनेमाच्या कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे

सातारा / प्रतिनिधी : 

आयआरके सिनेमा थिएटरमध्ये हरिओम फॅसिलिटी व विशाल गायकवाड यांच्या कंपनीमार्फत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना थकीत वेतन दिले जात नाही. तसेच पीएफही दिला गेला नाही, अशी तक्रार  कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.   

निवेदनात म्हटले आहे की, आम्ही मागील दोन वर्षापासून आयआरके सिनेमा थिएटरमध्ये काम करत आहे. परंतु, आमचा फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यातील दीड-दीड महिन्याचा पगार आम्हाला गेली आठ ते 9 महिने दिला नाही. आम्ही वारंवार फोन करुन समक्ष भेटून विनंती केली. आमचा पगार थकवला आहे. तसेच आमचा पीएफ दिलेला नाही. आम्ही आयआरके सिनेमाच्या क्यवस्थापकांना फोनवरुन विनंती करतो आहे. आमचा पगार मिळाला नाही तर दि.4 जानेवारीपासून कोणालाही तेथे काम करु देणार नाही, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.

Related Stories

हॅपी प्रपोज डे म्हणत व्यक्त झाल्या मनातल्या भावना

Patil_p

सातारा शहरात शुक्रवारी व्यापाऱ्यांचा बंद

Archana Banage

नियम धाब्यावर बसवणाऱया कास रोडवरच्या सहा हॉटेल चालकांना तालुका पोलिसांनी दाखवला इंगा

Patil_p

साताऱयात जुन्या वादातून युवकाचा निर्घृण खून

Omkar B

रिकव्हरी रेट 94.01 मुळे दिलासा

Patil_p

विश्वशांतीसाठीचा शिवपंचायतन महायज्ञ सोहळ्याला अलोट गर्दी

Patil_p