Tarun Bharat

सातारा : कराडातील व्यापारयाला संपवण्याचा कट उधळला

सांगलीचे चौघे गजाआड

सातारा / प्रतिनिधी :

कराड येथील ट्रक व्यापारी असलेल्या व्यक्तीला मारण्याची सुपारी सांगलीच्या चौघांनी घेतली होती. त्यासाठी दबा धरून बसलेल्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून सत्तुर, लाकडी दांडकी हस्तगत करण्यात आली आहेत. केरोबा बापु मेटकरी (वय २३ वर्षे रा.कपवाड रोड सत गिरणी, सिध्दनाथ कॉलनी ता.मिरज जि.सांगली), सलिम आप्पालाल नदाफ (वय २२ वर्षे रा.अष्टविनायक नगर कुपवाड राड विश्रामबाग ता.मिरज जि.सांगली.) , कुमार सोपान कोळी (वय २४ वर्षे रा.गजराज कॉलनी विश्रामबाग ता.मिरज जि.सांगली), प्रदिप बाळु माळी वय २४ वर्षे (रा.मंगलमुर्ती कॉलनी कुपवाड ता.मिरज जि.सांगली) अशी संशयितांची नावे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिली.

या कारवाईने कराड परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक आनंदसिंह साबळे, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, शरद बेबले, साबिर मुल्ला, प्रविण फडतरे, गणेश कापरे, केतन शिंदे, रोहित निकम, संकेत निकम, मयुर देशमुख, मोहसिण मोमीण, महेश पवार, संजय जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Related Stories

राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्षांना दिली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची संधी

datta jadhav

सोलापूर : लऊळ नजीक कार अपघात, दोघे गंभीर जखमी

Archana Banage

सातारा शहर पोलिसांनी परत केले 11 तोळे सोने

Patil_p

नागठाणेत विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट

datta jadhav

उपमुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची महापूजा करु नये !

Patil_p

केंद्र सरकारला पळ काढता येणार नाही

Amit Kulkarni