Tarun Bharat

सातारा, कराड वगळता अन्य तालुके नियंत्रणात

अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 14 जुलै 2021, सकाळी 10.25

● कराडचा आकडा तीनशेच्या आसपास स्थिर ● सातारा तालुक्यातही दीडशेच्या आसपास रूग्णवाढ ● फलटण,वाईसह इतर तालुके सावरले ● वातावरणातील बदलाने किरकोळ आजार वाढले ● रुग्णालायांमधे गर्दी वाढली ● गत 24 तासात 11238 चाचण्या, पॉझिटिव्हीटी 6.23 टक्के

सातारा / प्रतिनिधी : 

जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा कराड आणि सातारा तालुक्यातील आकडा अपवाद वगळता गेल्या 15 दिवसात स्थिर आहे. कराडला दैनंदिन रूग्णवाढ 250 ते 320 च्या दरम्यान होत असून, सातारा तालुक्यात 134 ते 198 या अंकादरम्यान रूग्णवाढ स्थिर आहे. त्यातही सातारा तालुका काहीसा आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, कराडला मंगळवारी पुन्हा 316 रूग्णांची भर पडली. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून या तालुक्यावरील कोरोनाचे सावट कायम असल्याचे आकडेवारीवरून दिसते. राज्यात मंगळवारी 7243 रूग्ण होते तर जिल्ह्यात 814 म्हणजे राज्याच्या रूग्णसंख्येच्या 11 टक्के होते. दरम्यान बुधवारी आलेल्या अहवालात गेल्या 24 तासात जिल्ह्यात 723  नव्या रूग्णांची भर पडली.

10 तालुक्यात 482 तर एकट्या कराड तालुक्यात 316 रूग्ण

जिल्ह्यात रूग्णवाढीचा आलेख कमी-जास्त होत आहे. मात्र, तो अपेक्षित प्रमाणात कमी होताना दिसत नाही. फलटण, वाई, खंडाळा, माण, कोरेगांव, पाटण, महाबळेश्वर, जावली या तालुक्यात रूग्णवाढ दोन अंकी असून या नऊ तालुक्यात मंगळवारच्या अहवालात एकूण रूग्णवाढ 311 झाली आहे. सातारा तालुक्यात तीन अंकी म्हणजे 171 रूग्ण वाढले असून  या दहा तालुक्यात 482 रूग्ण मंगळवारी वाढले. तर एकट्या कराड तालुक्यात 316 रूग्णांची नव्याने भर पडली आहे. कराड तालुक्यातील रूग्णवाढीचा वेग कमी होत नाही आणि शहराच्या बाजारपेठेतील गर्दीही कमी होत नाही. त्यामुळे कराडचा कोरोना कमी कसा यायचा हा प्रश्नच आहे. 

महाराष्ट्रात 7243 तर उत्तरप्रदेशात केवळ 59 रूग्ण

मंगळवारी महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतील रूग्णवाढीचा अहवाल आला. त्यामधे महाराष्ट्रात 7243 रूग्णांची नव्याने भर पडली होती तर लोकसंख्येने सर्वात मोठे असलेल्या उत्तरप्रदेशात केवळ 59 रूग्ण वाढल्याचे केंद्रिय अहवालात दिसत होते. उत्तरप्रदेेशातील 4 जिल्ह्यात एकही रूग्ण आढळला नाही. महाराष्ट्रातही मुंबईतील 454 रूग्णसंख्येच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात दुप्पट रूग्णवाढ झाल्याचे पहायला मिळाले. सातारासह सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातही तुलनेने रूग्णसंख्या जास्त वाढत आहे. 

वातावरणातील बदलाने सर्दी, खोकल्याचे आजार वाढले

मान्सूनचे जिल्ह्यात आगमन झाले असले तरी कधी मुसळधार पाऊस पडतोय तर कधी ऊन पडतेय. वातावरणातील सातत्याने होणारया बदलामुळे सर्दी, खोकला, तापाचे आजार वाढले असून विशेषता लहान मुलांवर या वातावरणाचा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे इतर दवाखान्यातही रूग्णांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे या वातावरणात जिल्हावासियांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

कोरोना आहेच…डेंग्यूला रोखावे

जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढ कायम असून, पॉझिटिव्हीटी रेट कमी जास्त होत आहे. त्यामुळे जिल्हा अजुनही लॉकडाऊनच्या नियमात अडकलेला आहे. यातच शहरांच्या काही भागात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने यावर उपाययोजना करत डेंग्यूचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. डेंग्युच्या डासांची पैदास वाढू नये म्हणून नगरपालिका, ग्रामपंचायतींनी काटेकोरपणे उपाययोजना राबवण्याची गरज आहे. 

मंगळवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमूने 12,01,507, एकूण बाधित 2,05,150, एकूण कोरोनामुक्त 1,91,153, मृत्यू 4,940,  उपचारार्थ रुग्ण 10,773

मंगळवारी जिल्ह्यात  बाधित 723, मुक्त 676, बळी 23

Related Stories

राखी पौर्णिमेनिमित्त बाजारपेठ सजली

Patil_p

पुणे, मुंबईकरांनी वाढवली जिल्हय़ाची चिंता

Patil_p

उदयनराजे समर्थकांकडून केंद्रीय मंत्री दानवेंच्या पुतळ्याचे दहन

Patil_p

विद्यापीठ परीक्षांच्या तारखा जाहीर

Kalyani Amanagi

टिकेची झोड उठल्यानंतर मुख्याधिकाऱयांचा निर्णय मागे

Patil_p

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग, ३ हॉटेलवर बोरगाव पोलिसांची कारवाई

Archana Banage