Tarun Bharat

सातारा-कागल महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्राच्या सुधारणेसाठी 558.24 कोटींचा निधी मंजूर

कराड / प्रतिनिधी : 

खा. श्रीनिवास पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राच्या सुधारणेसह दुरुस्तीच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी 558 कोटी 24 लाख एवढा भरघोस निधी मंजूर केला आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभारणीसह महामार्ग दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांचा महामार्गावरील प्रवास सुरक्षित व सुखकर होणार आहे.     

कागल ते शेंद्रे महामार्गाच्‍या पटृयातील पाच धोकादायक ठिकाणांच्‍या (ब्‍लॅक स्‍पॉट) दुरुस्‍ती व सुधारणांसाठी तब्‍बल 646 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामधील पाच पैकी चार ठिकाणे ही सातारा जिल्‍हयातील असून त्‍यामध्‍ये मलकापूर (ता. कराड) येथील नव्‍या उड्डाणपूलासाठी 459  कोटी 52 लाख रुपये, मसूर फाटा येथील अंडर पास पूलासाठी 47 कोटी 18 लाख, इंदोली फाटा अंडर पास पूलासाठी 45 कोटी 35 लाख आणि काशीळ फाटा येथे महामार्गाच्‍या दोन्‍ही बाजूस दीड कि.मी. अंतराच्या सर्व्‍हीस रस्त्यासाठी 6 कोटी 19 लाख  निधीची तरतूद करण्‍यात आलेली आहे. सदर कामांची अंमलबजावणी सातारा-कागल महामार्गाच्‍या सहापदरीकरण कामाबरोबरच करण्‍यात येणार आहे. खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून त्यांनी मागणी केलेल्या सदर कामांसाठी भरघोस निधी मंजूर झाला आहे. 

Related Stories

कोयना धरणक्षेत्रात भूकंपाचे धक्के

datta jadhav

खासगी सावकारांच्या मुसक्या आवळल्या

Patil_p

पोवईनाक्यावर भरदिवसा युवकाला दीड लाखाला लुटले

datta jadhav

शंभू स्मारकासाठी 80 लाख लोकवर्गणी लागणार

Patil_p

कराडला बेड वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू

Amit Kulkarni

कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपवण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे यावे – अजित पवार

Archana Banage