Tarun Bharat

सातारा : कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव येथे पोषण अभियान परिसंवाद

प्रतिनिधी / नागठाणे

महात्मा फुले कृषि विद्यापीठा अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव (ता. सातारा) नुकतेच राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर २०२९ पोषण अभियानाअंतर्गत पोषण परिसंवाचे आयोजन ईफको, सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आलेले होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कृषि विज्ञान केंद्रचे कार्यक्रम समन्वयक प्रा.मोहन शिर्के होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा समन्वयक, ईफको, सातारा संदीप रोकडे उपस्थित होते.

या कार्यक्रमांतर्गत उपस्थित शेतकरी, अंगणवाडी सेवीका व महिला यांना पोषण बागेच्या बियाण्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तांत्रिक सत्रामध्ये विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या भूषण यादगीरवार यांनी पोषणमुल्य आधारित बायोफोर्टीफायईड वाण आणि फळभाजीपाला लागवड तंत्रज्ञानाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच विषय विशेषज्ञ, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान डॉ. कल्याण बाबर यांनी निरोगी आरोग्यवर्धक आहाराची मुलतत्वे, पोषण मुल्यआधारित पोषण बागेचे महत्व आणि रानभाज्यांची पाककृती बद्दल माहिती सांगितले. तसेच उपस्थितातुन भानुदास चोरगे, कृषि सहाय्यक, जावळी यांनी रानभाज्यांचे औषधी गुणधर्म सांगितले. यावेळी पोषणमुल्य आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेऊन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. अंगणवाडी सेविकांनी कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव येथील प्रक्षेत्रावरील पोषण बागेला भेट देऊन त्याची माहिती घेतली.

यावेळी कार्यक्षेत्रातील शेतकरी, महिला शेतकरी, अंगणवाडी सेविका इ. बहुसंख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षणाची प्रस्तावना डॉ. कल्याण बाबर, विषय विशेषज्ञ यांनी केले तर डॉ. महेश बाबर, विषय विशेषज्ञ व संग्राम पाटील, कार्यक्रम सहाय्यक यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर सकटे, विषय विशेषज्ञ, यांनी केले. या कार्यक्रमावेळी कोविड १९ विषाणु महामारीच्या संदर्भातील सर्व आवश्यक त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते. कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Related Stories

स्मृतीदिनी जागल्या डॉ. दाभोलकरांच्या आठवणी

datta jadhav

महावितरणचा कर्मचारी लाच घेताना अटक

Patil_p

घरपट्टी वाढ प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

Patil_p

गडय़ा आपली झेडपीचीच शाळा बरी

Patil_p

कराडजवळ कंटेनरचा भीषण अपघात, दुचाकीस्वाराला चिरडले

Archana Banage

सातारा : हिंगणी व बिदाल येथील बंदी आदेश रद्द – जिल्हाधिकारी

Archana Banage