Tarun Bharat

सातारा : कोडोलीतील 98 वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात

प्रतिनिधी / सातारा : 

कोरोनाने वयोवृद्धांना चांगलेच जेरीस आणले आहे. मात्र, काही वृद्धांनी कोरोनाला नमवून पुन्हा आपण योद्धे असल्याचे दाखवून दिलेले आहे. असेच सातारा तालुक्यातील कोडोली येथील 98 वर्षीय सोपान गोविंद नलावडे. 

नलावडे पुष्पकर कोविड सेंटरमध्ये दि.25 रोजी उपचारासाठी दाखल झाले. त्यांचा स्कोअर होता 84 एवढा. त्यांच्यामध्ये पुष्कर कोविड सेंटरमध्ये कर्मचारी, डॉक्टर यांनी सकारात्मक उर्जा जागृत केली. औषधोपचार केला अन् ते ठणठणीत बरे झाले. त्यांना चार दिवसांमध्ये घरी सोडण्यात आले. त्यांनी कोरोनाला हरवून घरी कुटुंबियामध्ये निघाल्याचा आनंद पुष्करमधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या.  

सातारा जिल्ह्यात मृत्यू भयान बनू पहात आहे. वृद्ध म्हणेणात, ज्येष्ठ म्हणेणात, तरुण म्हणेणात सगळय़ांनाच कोरोनाने घेरलेले आहे. मृत्यू कधी कसा येईल हे सांगता येत नाही. रस्त्यावरुन सायरनचा आवाज करत जाणारी रुग्णवाहिका पहाताच प्रत्येकाला धडकी भरु पहात आहे. कोणाच्या घरात, कोणाच्या कुटुंबियामध्ये मृत्यू डोकावू पहात आहे. असे असताना कोरोनाच्या या आजारावरही मात करुन सुखरुप बरे होणारे वृद्ध रुग्ण सातारा जिह्यात आहेत. असेच कोडोलीतील सोपान गोविंद नलावडे हे 98 वर्षाचे वृद्ध. हे घरीच वृद्धपणामुळे असतात. परंतु त्यांना कसा दुर्दैवाने कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. धाप लागू लागली. थोडासा थकवा जाणवू लागताच त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सगळीकडे बेडची शोधाशोध केली असता त्यामध्ये त्यांना पुष्कर कोविड सेंटरमध्ये बेड मिळाला.

पुष्कर कोविड सेंटरमध्ये बेड मिळताच त्यांना दि. 25 रोजी उपचारासाठी दाखल केले. त्यांना जेव्हा दाखल केले होते तेव्हा त्यांचा श्वासोश्वास अत्यंत धिम्या गतीने चालला होता. कुटुंबियही चिंतेत होते. परंतु पुष्पर कोविड सेंटरचे डॉ. ऋतुराज देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबियांना आधार दिला अन् उपचार सुरु केले. त्यांच्या सर्व चेकअप केल्यानंतर त्यांना औषधे गोळय़ा सुरु केल्या. बघता बघता त्यांच्यामध्ये एक सकारात्मक उर्जा देण्यात आल्याने ते उपचाराला साथ देवू लागले. त्यांची ऑक्सिजन लेव्हलही वाढून नियमीत झाली. दि. 29 रोजी ते ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 
त्यांना बरे करण्यामध्ये डॉ. ऋतुराज देशमुख, डॉ. स्नेहल तुपे, सागर तेली, संकेत कांबळे, स्टॉप नर्स दिनेश काळे, सहयोग धायगुडे यांच्यासह टीमने उपचार दिले. त्यांना मानसिक आधार दिला.  

मुन्नाभाई एमबीबीएसची झाली आठवण
संजय दत्तच्या मुनाभाई एमबीबीएस या चित्रपटात रुग्णांना बरे करण्यासाठी मानसिक आधाराचीही गरज असते. तीच गरज व तोच आधार येथील कर्मचारी, डॉक्टर यांनी 98 वर्षाच्या नलावडे यांना दिला. त्यांच्यामध्ये सकारात्मकता आणली. त्यामुळे त्यांच्यात एक नवचैतन्य आल्याने ते बरे झाले. यामुळे मुनाभाई एमबीबीएस या चित्रपटाची आठवण जरुर झाली.

Related Stories

उमेद अभियानातील महिलांनी काढला मूक मोर्चा

Omkar B

कोरेगाव तालुक्यातील भाडळेत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Archana Banage

तीन दिवसात 4204 जणांची कोरोनावर मात

Patil_p

137 वर्षाचा वाईच्या सुखदुखाचा ब्रिटीशकालीन पूल नियतीच्या परिवर्तनात आज होणार जमीनदोस्त

Amit Kulkarni

नियम धाब्यावर बसवणाऱया कास रोडवरच्या सहा हॉटेल चालकांना तालुका पोलिसांनी दाखवला इंगा

Patil_p

फलटण पालिका

Patil_p