Tarun Bharat

सातारा : कोयना धरणाचे दरवाजे ४ फुटांवर

धरणातून प्रतिसेकंद 25 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; कोणत्याही क्षणी विसर्ग वाढणार

प्रतिनिधी / नवारस्ता

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाल्याने धरणात प्रतिसेकंद तब्बल 91 हजार 714 क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू झाल्याने रविवारी सकाळी साडे आठ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे 4 फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 25604 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

सध्या कोयना धरणात 90.57 टीएमसी पाणीसाठा झाला असून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी धरणातून आणखी विसर्ग वाढविण्याची दाट श्यक्यता आहे. तरी कोयना आणि कृष्णा काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन कोयना जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे.

Related Stories

भरतीच्या बहाण्याने साडेतीन लाखाला गंडा

Archana Banage

आदी कडक शब्दात ‘डोस’ नंतर मायेचा ‘डोस’

Archana Banage

सिव्हील हॉस्पिटलमध्ये थॅलेसेमिया रुग्णांचे हाल

datta jadhav

सातारा पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन

Archana Banage

महिला पोलिस अधिकायासह 5 जणांची कोरोनावर मात

Patil_p

वराडे येथे वन्यजीव उपचार केंद्र मंजूर

Patil_p
error: Content is protected !!