Tarun Bharat

सातारा : कोरोनाचा तेरावा आठवडा जास्त दाहक : जिल्ह्यात भयकंप

Advertisements

● जिह्यात 14 पॉझिटिव्ह : 20 कोरोनामुक्त
● दोन बाधितांचा मृत्यू
● या आठवड्यात 200 वाढवले
● 145 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
● दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
● कराड, पाटण, जावली, साताऱयात चिंता
● इन्स्टिटय़ुशनल क्वारंटाईन गरज वाढली


प्रतिनिधी/सातारा

23 मार्च ला जिल्ह्यात आलेल्या कोरोनाला आता सुमारे 13 आठवडे पूर्ण होत आहेत. गेला आठवडा सर्वात जास्त दाहक होता. यात बाधितांची संख्या 200 ने वाढली तर केवळ 42 जण मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 200 रुग्ण व्हायला 21 मे पर्यंत म्हणजे 58 दिवस लागले होते. या तेराव्या आठवड्याने आरोग्य यंत्रणेवर अचानक ताण आलेला आहेच शिवाय प्रशासन ही हतबल अवस्थेत आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात 20 मुक्त, 2 बळी गेले असून सकाळी 14 बाधित असल्याचा अहवाल आलेला आहे. तर रात्रीचा अहवाल उशिरा पर्यंत आलेला नव्हता.

काहीच नियंत्रण नसलेला लॉकडाऊन पुन्हा वाढवला

जिल्हय़ात कोरोनाविरुध्दच्या लढय़ात आता कोरोना बाधितांच्या संख्येने हजाराचा टप्पा ओलांडला असून बाधितांची एकूण संख्या 1 हजार 45 एवढी झाली असल्याने लॉकडाऊन एक महिन्याने वाढवल्याचा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंगळवारी पारित केला आहे. यामध्ये सध्या सुरु असलेल्या बाबी व वेळा वगळता नवीन काहीही सुरु होणार नसून बाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचा प्रशासनाचा रोख असून नवीन लॉकडाऊन दि. 31 जुलैपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालात जिल्हय़ातील 14 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून जिल्हय़ात 20 जणांनी कोरोनावर मात केली असल्याने कोरोनामुक्तांची संख्या 740 झाली आहे.

20 जणांची कोरोनावर मात

विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअरमध्ये उपचार घेत असलेल्या जिह्यातील 20 नागरिकांचा आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये कराड तालुक्यात सैदापूर येथील 29 वर्षीय पुरुष, सुपने येथील 37 वर्षीय महिला, तुळसण येथील 54 वर्षीय पुरुष, 1 वर्षीय बालक, चचेगाव येथील 30 वर्षीय महिला. जावली तालुक्यात शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला, म्हाते येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यात वाकळवाडी येथील 35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष, म्हासुर्णे येथील 18 वर्षीय महिला, शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40, 56 वर्षीय पुरुष, 2 वर्षीय बालक. माण तालुक्यातील खोकडे येथील 34 वर्षीय महिला. सातारा तालुक्यात सावली येथील 22 वर्षीय पुरुष, राजापुरी येथील 31 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालिका यांचा समावेश आहे.


जिल्हय़ात दोन बाधितांचा मृत्यु

काल रात्री उशिरा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या शेजवलवाडी ता. पाटण येथील 58 वर्षीय पुरुष व वडगाव उंब्रज ता. कराड येथील 59 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या दोघांना 10 दिवसापूर्वी श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे दाखल करण्यात आले होते. कोरोना बाधितांची एकूण संख्या 45 झाली आहे.


मंगळवारी 14 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

कृष्णा 14 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील 18 वर्षीय युवक, 45 व 20 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, कुसरुंड येथील 40 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 60 वर्षीय महिला,

कराड येथील गजानन हौसिंग सोसायटी येथील 40 वर्षीय पुरुष, चरेगाव येथील 32 वर्षीय पुरुष4, शिवडे येथील 36 वर्षीय पुरुष, तारुख येथील 70 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 10 वर्षाचा मुलगा, विद्यानगर, सैदापूर येथील 26 वर्षीय महिला,मलकापूर येथील 26 वर्षीय पुरुष, नडशी येथील 31 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

145 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

मंगळवारी 145 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.


गोडोली नव्हे तळेगाव-दाभाडे

27 जून रोजी एन.सी.सी.एस. पुणे यांनी कळविलेल्या रिपोर्टमधील 55 वर्षीय पुरुष हा गोडोली येथील असल्याचे कळविले होते, परंतु त्याचे मुळ गाव पुणे जिह्यातील तळेगाव दाभाडे ता. मावळ असल्याने या बाधिताची नोंद जिह्यातून वगळण्यात आली आहे, असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

240 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा जिल्हा रुग्णालय येथील 40,
कृष्णा येथील 52,
वेणूताई कराड येथील 26,
वाई येथील 25,
शिरवळ येथील 32,
रायगाव येथील 25,
पानमळेवाडी येथील 19,
मायणी येथील 15,
महाबळेश्वर येथील 2 व
पाटण येथील 4
असे एकूण 240 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

कराड, सातारा, जावली, पाटण हॉटस्पॉट

गत महिन्यात कोरोनामुक्तीचा वेग पाहता आता संपूर्ण जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल असे वाटत होते. मात्र, जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात बाधितांची संख्या वाढली असून कोरोनामुक्तीचा वेग कमी झाला आहे. यामध्ये कराड, सातारा, जावली, पाटण तालुके हॉटस्पॉट बनू पहात आहेत. प्रशासन स्थितीवर नजर ठेवून उपाय योजना करत असले तरी प्रवासाची हिस्ट्री असलेले व त्यांच्या कुटुंबातील सदस्य बाधित आढळून येत असल्याने यापुढे अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


जिल्हय़ात मंगळवारपर्यंत

एकूण बाधित 1045
एकूण मुक्त 740
एकूण बळी 45

मंगळवारी

एकूण बाधित 14
एकूण मुक्त 20
एकूण बळी 02


Related Stories

टोकीयो ऑलिंम्पिक 2020 स्पर्धेत निवड झालेल्या प्रविण जाधव यांच्या पालकांचे जिल्हाधिकारी यांनी केले अभिनंदन

Amit Kulkarni

साठेंचा ‘मनसुख हिरेन’ होऊ नये, त्यांना सुरक्षा पुरवा

datta jadhav

खरा मुख्यमंत्री कोण हेच कळेना

Kalyani Amanagi

राजधानी दिल्लीत जाणवले भूकंपाचे धक्के 

Rohan_P

सातारा जिल्ह्याला पुन्हा झटका, 28 अहवाल पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

शरद पवारांचे मोदींना पत्र; साखर उद्योग वाचवण्यासाठी केली भरीव निधीची मागणी

datta jadhav
error: Content is protected !!