Tarun Bharat

सातारा : कोरोना काळात जनजागृतीसह काळजी घेणे आवश्यक : डॉ. सचिन पाटील

प्रतिनिधी/सातारा

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 2 हजार 677 इतके रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. यंत्रणा संपूर्ण सतर्क आहे. शहरासह ग्रामीण भागातही; कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. आरोग्य विभागाची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जनतेची साथ आता अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

सुशिक्षित नागरिकांनी तसेच इतर घटकांनी प्रबोधनाला हात द्यावा प्रबोधनासाठी जिल्हा परिषदेतर्फे अनेक प्रकारची पुस्तके माहितीपत्रके प्रसारित करण्यात आली आहेत त्याचे गावपातळीवर वाचन होणे गरजेचे आहे. प्रादुर्भाव वाढत असला तरी नियम पाळल्यास चिंता करण्याचे कारण नाही. कोरोना मुक्तीची संख्याही लक्षणीय आहे. सर्वच आरोग्य कर्मचारी, अधिकारी तसेच इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस काटेकोर नियोजन करून प्रतिबंधासाठी झटत आहेत. काटेकोरपणे नियम पाळले जाणे गरजेचे आहे. सर्व कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर सहकार्य करावे, असे नमूद करून पुढे म्हटले आहे की, ग्रामसुरक्षा समिती आणि शहरातील प्रभाग समिती यांना सर्व नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे.

आयुष मंत्रालय यांनी दिलेल्या आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना पाळाव्यात आणि कुटुंबात अवलंबावे. रोज अर्धा तास ध्यानधारणा योगासने करणी आयुर्वेदिक काढा चवणप्रश घेणे अर्सेनिक अल्बम गोळ्यांचा कोर्स करणे आदी बाबी कौटुंबिक पातळीवर अवश्य कराव्यात त्याचा देखील प्रादुर्भावाच्या प्रतिबंधासाठी खूप फायदा आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष अविरतपणे गेले चार महिने पेक्षा अधिक काळ नियोजनबद्ध उपाय योजना करीत आहे. समाजातील सर्वच घटकांनी या प्रयत्नांना मनापासून सहकार्य करावे; असे देखील पुढे नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

बारा डबरेतील स्वच्छता उद्यान हिरवाईने बहरले

Patil_p

“पूर्वी संसदेत अभ्यासपूर्ण चर्चा व्हायच्या, सध्याची परिस्थिती वाईट” – सरन्यायाधीश

Archana Banage

कोल्हापूरची पंचगंगा २५ फुटांवर, मुख्यमंत्र्यांकडून एनडीआरएफला सज्ज ठेवण्याचे आदेश

Rahul Gadkar

प्रत्येक कॉलेजमध्ये कोव्हिड सेंटर सुरु करा

Patil_p

बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी सातारा पालिकेचे परफेक्ट नियोजन

Patil_p

वन्यजीव शिकारीच्या घटना रोखण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’

datta jadhav