स्थानिक नागरिकांनी राबवली सह्यांची मोहीम, नगरसेविका आशा पंडित यांनी दिला जन आंदोलनाचा इशारा
सातारा / प्रतिनिधी
येथील फुटके तळे परिसरात असलेले गजानन मंगल कार्यालय आहे. येथे कोरोना सेंटर करण्याच्या हालचाली सुरू आहेत.हे ठिकाण मध्यवर्ती गर्दीच्या ठिकाणी आहे.येथे हे सेंटर करू नये यासाठी स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत.नगरसेविका आशा पंडित यांनी जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
नगरसेविका आशा पंडित यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येथील शनिवार पेठेतल्या गजानन मंगल कार्यालयात सम्राट मंडळांच्या सहकार्याने कोरोना रुग्णासाठी कोरोना केंद्र उभे करण्यात येत आहे.असे आम्हाला समजले आहे.हा संपूर्ण परिसर दाट लोक वस्तीचा आहे.या सेंटरभोवती 10 अपारमेण्ट व 50 बसकी घरे आहेत.यामुळे स्थानिक रहिवाशांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.मुळात हे सेंटर शासनाच्या नियमावलीत बसत नाही.बेकायदेशीरपणे उभे करू नये, स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेतले नाही.त्यामुळे नागरिकांचा विरोध आहे.येथे न्यू ईग्लिश स्कुल आहे.दिलेली परवानगी रद्द करावी, कोरोना सेंटर येथे करू नये अन्यथा नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे

