Tarun Bharat

सातारा : गोळीबार मैदान गोडोलीत बिबट्याकडून कुत्र्याचा फडशा

●वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली भेट
●नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
●आठवडाभर परिसरात बिबट्याचा वावर

सातारा/प्रतिनिधी

किल्ले अजिंक्यतारा परिसर, यवतेश्वर परिसरात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. अनेकांच्या कॅमेऱ्यात आला आहे. गेल्या चार दिवसात गोडोलीतल्या गोळीबार मैदान परिसरातील पायरी पार्क सोसायटीत बिबट्याचा वावर वाढला आहे. मनोज कुभांर यांच्या कुत्र्यावर हल्याची घटना घडली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशीच कोळी यांच्या घरासमोर बसलेल्या कुत्र्याचा बिबट्याने रात्री फडशा पाडला. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. आठवड्यात बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्यास वनविभागास कळवण्याची विनंती करत काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

शहरालगत असलेल्या किल्ले अजिंक्यताऱ्यावर, सोनगाव, यवतेश्वर, शाहूपुरी या भागात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. बिबट्याचा वावर वारंवार घडते. गेल्या चार दिवसात गोडोलीतील गोळीबार मैदान परिसरातील पायरी पार्क येथे बिबट्या येत आहे. मनोज कुंभार यांच्या कुत्र्यावर हल्ला केला होता. सुदैवाने त्यांनी आरडाओरडा केल्याने कुत्र्याला सोडवण्यात यश आले. दुसऱ्या दिवशी कोळी यांच्या घरासमोर रात्री एका कुत्र्याचा फडशा पाडल्याची चर्चा असून त्यांच्या दारात सकाळी रक्त दिसत होते. वनविभागाच्या अधिकारी भेट देऊन पाहणी केली. काही नागरिकांनी ठसे पाहिले, असल्याचे सांगण्यात येते. नागरिकांनी बिबट्याचे दर्शन पुन्हा झाल्यास वन विभागास कळवावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Related Stories

जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुख आणि मलिक यांच्या मतदानावर प्रश्नचिन्ह

Abhijeet Khandekar

पूरग्रस्त भागात वीज बिल वसुली स्थगित

Archana Banage

शेतकऱ्यांना पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता : उद्धव ठाकरे

Tousif Mujawar

लहान मुलांना लस कधी ? अदर पूनावालांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा

Archana Banage

कुंभोज: कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १६ जणांचा अहवाल निगेटिव्ह

Archana Banage

सातारा : नियमांचे पालन न केल्यास दंडासह ७ दिवस दुकान बंदची कारवाई

Archana Banage