Tarun Bharat

सातारा : जमिनीच्या वादातून निसराळे येथे सख्ख्या भावांवर चाकूहल्ला

दोन हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात, स्कॅर्पिओ व दुचाकी जप्त


प्रतिनिधी / नागठाणे

जमिनीच्या वादातून चुलत भावाने त्याचा भाचा व अन्य साथीदारांच्या मदतीने दोन सख्ख्या भावांवर चाकूसारख्या हत्याराने वार केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.निसराळे( ता.सातारा) येथे शनिवारी सायंकाळी भररस्त्यातच ही थरारक घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली.यावेळी घटनास्थळी पोहचलेल्या बोरगाव पोलिसांनी पाठलाग करून दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले तर अन्य संशयित फरार झाले.सचिन साहेबराव घोरपडे व सोमनाथ साहेबराव घोरपडे अशी या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भावांची नावे आहेत.
याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,निसराळे येथील सचिन साहेबराव घोरपडे,सोमनाथ साहेबराव घोरपडे व त्यांचा संशयित चुलत भाऊ(संपूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्यात जमिनीच्या कारणावरून वाद होता.याच वादातून संशयित चुलत भावाने शनिवारी सकाळी सचिन घोरपडे व सोमनाथ घोरपडे यांच्याविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी या दोन्ही सख्ख्या भावांना सायंकाळी चौकशीसाठी बोलावले होते.

सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास सचिन घोरपडे व सोमनाथ घोरपडे हे बंधू चौकशीसाठी निसराळे गावातील मुख्य रस्त्याने बोरगावकडे निघाले असतानाच संशयित चुलत भाऊ,त्याचा सातारा येथील भाचा व भाच्याचे तीन ते चार साथीदार (नावे समजू शकली नाहीत) यांनी त्यांना अडवुन त्यांच्याशी भांडू लागले.यावेळी त्यांच्यातील वाद विकोपाला जात असल्याचे पाहून गावातील काही ग्रामस्थानी याची माहिती बोरगाव पोलिसांना दिली.सपोनि डॉ.सागर वाघ तात्काळ कर्मचाऱयांसोबत घटनास्थळाकडे रवानाही झाले.

दरम्यान,इकडे वाद विकोपाला जाऊन संशयितांनी दोन्ही भावांवर चाकूसारख्या धारदार हत्याराने पोटात,छातीवर व पाठीवर वार करून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.याचवेळी पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर हल्लेखोर पळून जाऊ लागले.यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून हल्लेखोरांपैकी दोघांना जेरबंद केले.तर अन्य संशयित पळून जाण्याचा यशस्वी झाले.पोलिसांनी तातडीने जखमी झालेल्या दोन्ही भावाना उपचारासाठी सातारा येथे पाठवले.

यावेळी घटनास्थळावरून पोलिसांनी हल्लेखोरांनी वापरलेली एक स्कॅर्पिओ व एक नविकोरी दुचाकी घटनास्थळावरून ताब्यात घेतली.सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देत तपासकामी सूचना दिल्या.रात्री उशिरापर्यंत या घटनेची फिर्याद दाखल करण्याचे काम बोरगाव पोलीस ठाण्यात सुरू होते.

Related Stories

शिवसेनेच्या सुरेखा पखाले बिनविरोधने सेनेने खाते खोलले

Patil_p

सातारा : …अखेर बावधनचं बगाड निघालं

datta jadhav

सदरबझारमधील घरकुलांची सोडत निघेना

datta jadhav

Sangli : हवेत फायरिंग करून दहशत माजवणार्यास अटक

Abhijeet Khandekar

वादग्रस्त पूररेषा टेंडरमधील भ्रष्टाचार बाहेर काढणारच

datta jadhav

शहरात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

Amit Kulkarni