Tarun Bharat

सातारा : जिल्हा पाच हजारापुढे; कराडमध्ये व्हेंटीलेटर अभावी सहावा बळी

●सात जणांचा मृत्यू
● रात्रीच्या अहवालात २०३ बाधित
●77 जणांना डिस्चार्ज
●कराडमध्ये संताप
● चोरे येथे एकाच दिवसात २५ बाधितप्रतिनिधी/सातारा

सातारा जिल्हय़ाने गुरूवारी कोरोना बाधित रूग्ण संख्येचा 5 हजाराचा आकडा पार केला. रात्री उशिरा आलेल्या अहवालात २०३ इतके बाधित आले आहेत. कराड तालुक्यात रूग्ण संख्या 1 हजारावर पोहोचल्याने येथील कोविड हॉस्पिटल्स आणि प्रशासनावर मोठा ताण आला आहे. त्यातच व्हेंटिलेटर न मिळाल्याने शहरातील आणखी एकाचा काल मृत्यू झाला. आतापर्यंत व्हेटिलेटर अथवा वेळेत उपचार न मिळाल्याने 6 मृत्यू त्यामुळे शहरात संतापाचे वातावरण आहे. कराड येथील तीनही हॉस्पिटल जिल्हय़ासाठी असून शहरात बाधित असणाऱया रूग्णांना बेडसाठी वणवण फिरावे लागत आहे. अन्य आजारांच्या रूग्णांचीही हीच अवस्था असल्याने संताप व्यक्त होत आहे. गुरूवारी 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*व्हेंटिलेटर न मिळाल्याने व्यापाऱ्याचा मृत्यू*
बुधवारी येथील भाजी मंडईतील व्यापाऱ्याचा व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने दुर्देवी मृत्यू झाला. ही शहरातील सहावी घटना आहे. शहरात 300 दवाखाने असताना व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने शहरात संतापाचे वातावरण आहे. या रूग्णास धाप लागली होती. नातेवाईकांनी येथील तिन्ही कोविड हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. मात्र व्हेटिलेटर मिळाला नाही. रूग्णवाहिकाही लवकर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे सायंकाळी सातारा येथे शासकीय रूग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहरात असे सहा मृत्यू झाले असताना शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी गप्प का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. दरम्यान, दक्ष कराडकरचे प्रमोद पाटील यांच्यासह साबिर मुल्ला व नागरिकांनी प्रांत तथा इन्सिडेंट अधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देऊन व्हेंटिलेटर न मिळाल्याने आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

*चोरेत अँटिजन टेस्टमध्ये 25 पॉझिटिव्ह*
कराड तालुक्यातील चोरे येथे आरोग्य विभागाने कोरोना चाचणीचे अँटिजन शिबिर घेतले. यात 25 जण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. गाव सील करण्यात आले आहे. कारखान्याच्या कामगाराला येथे प्रथम लागण झाली होती. त्याच्या संपर्कातून आठ जण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर चोरे येथे अँटिजन टेस्ट शिबिर घेण्यात आले. यात 99 जणांची चाचणी करण्यात आली. यात चोरे येथील 21 तर धावरवाडी येथील 4 जण पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय अधिकाऱयांनी गावास भेटी दिल्या असून निर्बंधांचे कडक पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

*7 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू*
सातारा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात वासोळे ता. सातारा येथील 43 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. साताऱयातील खाजगी रुग्णालयात शहरातील गुरुवार पेठेतील 75 वर्षीय महिला, कोडोली (ता. सातारा) 58 वर्षीय महिला, जकातवाडी (ता. सातारा) येथील 75 वर्षीय पुरुष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेले अहवाल कोरोनाबाधित आहेत. कराड येथील खाजगी रुग्णालयात सोनवडे (ता. पाटण) येथील 68 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रूग्णालयात कोरेगाव येथील 43 वर्षीय महिला व कराड येथील खासगी रूग्णालयात आटके (ता. कराड) येथील 82 वर्षीय महिला या दोघा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

*77 नागरिकांना डिस्चार्ज*
गुरूवारी जिल्हय़ात एकुण 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला. दहा दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये
*कराड* तालुक्यातील येळगाव येथील 46 वर्षीय महिला व 16 वर्षीय युवक, शारदा क्लिनिक कराड येथील 40 वर्षीय पुरुष, सवादे येथील 32, 52, 35 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 1 वर्षीय बालिका, 35, 42 वर्षीय महिला, 14, 7, 14, 12, 45, 13, 31, 39 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 40 वर्षीय महिला, सैदापूर येथील 32 वर्षीय पुरुष, कोर्टी येथील 40 वर्षीय महिला, शिवडे येथील 25, 63, 29, 27 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय महिला, उंब्रज येथील 13 वर्षीय युवक व 65, 25 वर्षीय पुरुष, साजुर येथील 60 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 22, 37 वर्षीय पुरुष, किवळ येथील 36 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 25, 42 वर्षीय महिला व 2 वर्षीय बालिका व 31, 25 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडीकल कॉलेज येथील 25, 27 वर्षीय महिला, खुबी येथील 52 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 32 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 25 वर्षीय पुरुष, नांदगाव येथील 52 वर्षीय महिला, ओंडोशी येथील 10, 14 वर्षीय बालिका व 2 वर्षीय बालक.
*पाटण* तालुक्यातील चाफळ येथील 28 वर्षीय पुरुष, आंब्रग येथील 55, 31 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, मल्हारपेठ येथील 28 वर्षीय पुरुष, खळे येथील 50 वर्षीय महिला, पाटण येथील 16 वर्षीय युवती, बांबवडे येथील 21 वर्षीय महिला, कवठेकरवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, नेरळे येथील 45 वर्षीय महिला.
*वाई* तालुक्यातील बोपेगाव येथील 18 वर्षीय युवती, धनगरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष.
*सातारा* तालुक्यातील सोनापूर येथील 32, 58 वर्षीय महिला व 68 वर्षीय पुरुष., सातारा शहरातील लक्ष्मी टेकडी सदरबझार येथील 24, 28, 32, 55 वर्षीय महिला व 62, 35 वर्षीय पुरुष तसेच 3 महिला व 2 पुरुष, जिहे येथील 45 वर्षीय पुरुष, भैरवनाथ कॉलनीतील 33 वर्षीय पुरुष.
*खंडाळा* तालुक्यातील कबुले आळी शिरवळ येथील 57 वर्षीय पुरुष.
*कोरेगाव* तालुक्यातील वाठार येथील 17 वर्षीय युवक व 5 वर्षीय बालिका यांचा समावेश आहे.

*386 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 31, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 8, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 27, कोरेगाव 10, वाई येथील 46, शिरवळ येथील 62, रायगाव येथील 42, पानमळेवाडी 30, मायणी 13, महाबळेश्वर 28, पाटण 20, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 69 असे एकुण 386 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहे.

*कराड पालिकेतर्फे अॅन्टिजन चाचणीची सोय*
शहरात कोरोना बाधित रूग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन कराड नगरपालिकेतर्फे टिळक हायस्कूलमध्ये अॅन्टिजन टेस्टची सुविधा गुरूवारपासून सुरू करण्यात आली. त्यामुळे बाधित रूग्णांचे रिपोर्ट तातडीने मिळण्याची सोय झाली आहे. नगरपालिकेच्या वतीने टिळक हायस्कूलमध्ये अॅन्टिजन चाचणीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. सर्व नगरसेवक, पञकार व नागरिकांना विनंती आहे की, आपल्या जवळपास, वॉर्डामध्ये कुणीही संशयित रुग्णग्न असल्यास अथवा कोरुग्णग्णाच्या संपर्कात आलेली व्यक्ती असल्यास किंवा को मॉरबीट व्यक्ती असल्यास त्यांना विनामूल्य टेस्ट करुन घेण्याबाबत कळवावे. जिल्हाधिकारी शेखर सिंह व प्रांत उत्तम दिघे यांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात किट उपलब्ध होणार आहेत. ही तपासणी रोज सकाळी 11 वाजल्यापासून होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.

*बुधवारी रात्री 196 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह*
काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 196 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
*कराड 43* तालुक्यातील वडगाव हवेली येथील 2 वर्षाची बालिका, 31 वर्षाची महिला, मलकापूर येथील 55 वर्षाची महिला, काले येथील 65 वर्षीय पुरुष, तळमावले येथील 34 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील, 50 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ येथील 45 वर्षीय पुरुष, दिवशी येथील 70 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 70 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 35 वर्षीय पुरुष, वहागाव येथील 24 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 61 वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील 57 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 67 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ येथील 65 वर्षीय पुरुष, वडोली येथील 33 वर्षीय पुरुष, काले येथील 67 वर्षीय महिला, कोलेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 33 वर्षाचा पुरुष, 33 वर्षाची महिला, मार्केटयार्ड, येथील 55 वर्षीय पुरुष, चोरे येथील 30 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 72 वर्षीय पुरुष, वाठार येथील 55 वर्षीय महिला, कोळे येथील 41 वर्षीय महिला, रविवार पेठ, कराड येथील 46 वर्षीय पुरुष, कराड येथील 54, 72 वर्षीय पुरुष, कराड येथील 33 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 38 वर्षीय महिला, मंगळवार पेठ, कराड येथील 23 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय महिला, काले येथील 19 वर्षीय महिला, जुळेवाडी येथील 32 वर्षीय महिला, कोळे येथील 43 वर्षीय पुरुष, 57, 26 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 37 वर्षीय महिला, मलकापूर येथील 52 वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील 46 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 72 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 62 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 40, 14 वर्षाची महिला.
*पाटण 5* तालुक्यातील माजगाव येथील 30 वर्षीय पुरुष, सणबूर येथील 21 वर्षीय पुरुष, पाटण येथील 21 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, पाटण येथील 53 वर्षीय पुरुष.

*कोरेगाव 12* तालुक्यातील 12 देऊर येथील 54 वर्षीय महिला, 14 वर्षाचा युवक, 6 वर्षाची मुलगी, 37 वर्षाची महिला, वाठार किरोली येथील 5 वर्षाचा बालक, 2 वर्षाची बालिका, 65,65, 28 वर्षाची महिला, 3 वर्षाचा बालक, 38 वर्षीय पुरुष, हिवरे येथील 29 वर्षीय पुरुष.
*वाई 46* तालुक्यातील पसरणी येथील 35 वर्षीय महिला, 17 वर्षाची युवती, 15 वर्षाचा युवक, फुलेनगर, वाई येथील 57 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, वाई येथील 21 वर्षीय महिला, गणपतीआळी येथील 27 वर्षीय महिला, 5 वर्षाचा बालक, 58 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, 68 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरुष, 13 वर्षाची मुलगी, सोनगीरीवाडी येथील 48 वर्षीय महिला, 1 वर्षाची बालिका, रविवार पेठ, वाई येथील 62, 34 वर्षीय पुरुष, वाई येथील 10 वर्षाची मुलगी, 28 वर्षाची महिला,37 वर्षाची महिला, 14 वर्षाची मुलगी, 69 वर्षाचा पुरुष, वाई येथील 60 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष42 वर्षाची महिला, 73 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 11 वर्षाचा मुलगा, 12 वर्षाची मुलगी, 40 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, वाई येथील 33 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 9 वर्षाची मुलगी, 12 वर्षाची मुलगी, 10 वर्षाचा मुलगा, 40 वर्षाची महिला 48 वर्षाचा पुरुष, 28 वर्षीय महिला.
*सातारा 30* तालुक्यातील, सातारा येथील 38 वर्षीय महिला, सदाशिव पेठ येथील 25 वर्षीय पुरुष, सीव्हील हॉस्पीटल, सातारा येथील 25 वर्षीय महिला, तामजाईनगर येथील 79 वर्षीय पुरुष, वासोळे येथील 52 वर्षीय पुरुष, सदरबझार, सातारा येथील 19 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 41 वर्षीय पुरुष, सीव्हील हॉस्पीटल येथील 30 वर्षीय महिला, जकातवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, वरणे येथील 60 वर्षीय महिला, गोडोली, सातारा येथील 45 वर्षीय महिला, पोगरवाडी येथील 39 वर्षीय महिला, कामटे येथील 51 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 54 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, चिंचणेर येथील 18 वर्षाचा युवक, लिंब येथील 18, 8 वर्षाची मुलगी, पळशी येथील 50 वर्षीय पुरुष, सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, काटकरवाडी ता. सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील 18 वर्षीय महिला, 12 वर्षाचा मुलगा, 54 वर्षीय पुरुष, 40 वर्षाची महिला, तारगाव येथील 17, 21 वर्षाची महिला, कृष्णानगर, सातारा येथील 46 वर्षीय पुरुष.
*जावली 8* तालुक्यातील दूदूस्करवाडी येथील 64 वर्षीय पुरुष, कुडाळ येथील 11 वर्षाचा बालक, दूदुस्करवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, कुडाळ येथील 34 वर्षीय पुरुष, 2 वर्षाचा बालक, 12 वर्षाची मुलगी, कुडाळ येथील 21 वर्षीय पुरुष,
*खटाव 19* तालुक्यातील मायणी येथील 34 वर्षीय पुरुष, 32 वर्षाचा पुरुष, 6 वर्षाचा बालक, 70 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 42, 80 वर्षीय पुरुष, सुर्याचीवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, खबालवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, 17 वर्षाची युवती, वांझोळी येथील 26, 29 वर्षीय पुरुष, मोराळे येथील 38 वर्षीय महिला, 18 वर्षाची महिला, 13 वर्षाचा मुलगा, 19 वर्षाची महिला, चितळी येथील 46 वर्षीय पुरुष, 8 वर्षाची बालिका, 44 वर्षाची महिला.
*खंडाळा 13* तालुक्यातील, सुंदरनगर, शिरवळ येथील 39 वर्षीय पुरुष, शिर्के कॉलनी, शिरवळ येथील 22 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 27, 28 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय पुरुष, गोनडोली येथील 52 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 17 वर्षाचा युवक, शिवाजी चौक, खंडाळा येथील 55 वर्षीय पुरुष, विंग येथील 45 वर्षीय पुरुष, 78 वर्षीय पुरुष.
*महाबळेश्वर 2* तालुक्यातील, बेल ऐअर हॉस्पीटल, पाचगणी येथील 47 वर्षीय पुरुष, गडाळवाडी येथील 28 वर्षीय पुरुष.

*फलटण 8* तालुक्यातील मलटण येथील 22, 25 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, राजाळे येथील 21 वर्षीय महिला, गोखळी येथील 9 वर्षाची मुलगी, 12 वर्षाचा मुलगा, 45 वर्षाचा पुरुष, जिंती नाका येथील 42 वर्षीय पुरुष.
*खासगी* लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये वासोळी ता. वाई येथील 46 वर्षीय पुरुष, आनेवाडी. ता. जावली येथील 36 वर्षीय महिला, कोंढावळी लिंब येथील 42 वर्षीय पुरुष, डबेवाडी ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, सातारा येथील 75 वर्षीय महिला, कुमठे ता. कोरेगाव येथील 61 वर्षीय पुरुष. भवानीनगर, सांगली येथील 66 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

*जिल्हय़ात गुरूवारी*
एकुण बाधित २०३
एकुण मुक्त 77
एकुण मृत्यू 07

*जिल्ह्यात गुरुवारपर्यंत*
घेतलेले एकुण नमुने 31198
एकुण बाधित 5179
घरी सोडण्यात आलेले 2426
मृत्यू 159
उपचारार्थ रुग्ण 2594

Related Stories

दगडाने ठेचून युवतीचा खून

datta jadhav

“उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत मोठं म्हणून…”, अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Archana Banage

“अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन चूक केली”- संजय राऊत

Archana Banage

महात्मा फुले जीवनदायीत कोल्हापुरातील ४४ दवाखान्यांचा समावेश

Archana Banage

पालकमंत्री सन्माननीय आहेत; उदयदादा जवळचे मित्र होते

Amit Kulkarni

सोमवारपर्यंत वीजबिले माफ न झाल्यास जनआंदोलन : मनसेचा इशारा

Tousif Mujawar