Tarun Bharat

सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस

जरंडेश्वर कारखान्याला दिलेल्या कर्जाबाबत मागितला खुलासा

प्रतिनिधी/ सातारा

शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेला शुक्रवारी सायंकाळी ईडीची नोटीस धडकली आहे. त्या नोटीसीमध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज पुरवठा कसा काय केला याची तातडीने माहिती सादर करा, असे म्हटले आहे. या नोटीसीमुळे जिह्यात खळबळ उडाली असून नेमकी जिल्हा बँक कशाच्या बेसवर कर्ज पुरवठा करते याचीच उलटसुलट चर्चा सुरु होती. दरम्यान, जरंडेश्वर साखर कारखान्यास सातारा जिल्हा बँकेने केलेला कर्ज पुरवठा नियमानुसारच केला असल्याचे बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

सातारा जिह्याच्या सहकार क्षेत्रावर पूर्णतः राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन जरी भाजपाचे आमदार असले तरीही बँकेवर सर्व होल्ड हा राष्ट्रवादीचाच आहे. शेतकऱयांच्या नावाचा वापर नेहमीच बँकेकडून केला जातो. वास्तविक बँकेचे अनेकदा वाभाडे बँकेचे संचालक आमदार जयकुमार गोरे यांनी बाहेर काढले होते. नुकतीच शुक्रवारी सायंकाळी बँकेच्या पत्रव्यवहार शाखेमध्ये ईडीकडून नोटीस पोहचली. त्या नोटीसीचा शुक्रवारी सायंकाळपर्यंत कुठे गवगवा झाला नव्हता मात्र शनिवारी सकाळी बँकेला ईडीच्या आलेल्या नोटीसीची बातमी वाऱयासारखी पसरली.

जरंडेश्वर कारखान्यावर ईडीने कारवाई केलेली आहे. कारखान्याशी संबंधित असणाऱया कंपन्यांची चौकशी सुरु आहे. हा कारखाना ज्यांनी लिलावात घेतला त्यांना चार बँकांनी कर्ज पुरवठा केला होता. त्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही 96 कोटींचे कर्ज दिल्याचे समोर आले आहे. हा कर्ज पुरवठा नेमका कसा केला याची माहिती तातडीने ईडीने मागवली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून केवळ आम्ही येथे पुरस्कार घेतला तेथे पुरस्कार घेतला अशीच प्रसिद्धी सातत्याने देवून जिल्हावासियांच्यामध्ये बिंबवण्याचे प्रयत्न सातत्याने केले जातात. प्रत्यक्षात जिल्हा बँकेबाबत सर्वसामान्यांमध्ये तीव्र रोष आहे. त्यातच आता तर ईडीने नोटीस बजावल्याने बँकेच्या प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

जिह्यातील इतर बँकांच्या चेअरमनांचेही फोन झाले स्वीच ऑफ

ईडीची नोटीस जिल्हा बँकेत पोहचल्याची बातमी वाऱयासारखी पसरताच ज्या ज्या बँकांनी जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज पुरवठा केला त्या त्या बॅंकांनाही अशीच नोटीस आलेली आहे काय हे विचारणा करण्यासाठी अनेक सहकारातील जानकारांनी फोनाफोनी केली असता त्या बँकेच्या चेअरमनांचा फोन स्वीच ऑफ होता. दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांनी नोटीसीबाबत आम्ही प्रसिद्धीस पत्रक काढत असल्याचे सांगितले. बँकेतर्फे काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कारखान्याला केलेला कर्जपुरवठा हा नियमानुसारच आहे.

Related Stories

जायबंदी क्रिकेटपटूला भेटून जागवल्या जुन्या आठवणी

Patil_p

कास तलाव झाला ओव्हरप्लो

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जन्मभूमीला लागलीय आस!

datta jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार जपान च्या विशेष दौऱ्यावर

Archana Banage

सातारा : 67 जण झाले कोरोनामुक्त, तिघांचा बळी

Archana Banage

Panhala Fort: किल्ले पन्हाळगडाचे अस्तित्व पुन्हा धोक्यात

Abhijeet Khandekar