Tarun Bharat

सातारा जिल्हा बँक चेअरमनपदी नितीन काका, तर व्हाईस चेअरमनपदी अनिल देसाई

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडीसाठी थेट पवार साहेबांचा मेसेज येताच चेअरमन म्हणून वाई विकास सेवा सोसायटीतुन बिनविरोध निवडून आलेले नितीन काका यांना सर्वानुमते बिनविरोध करण्यात आले तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची निवड करण्यात आली. निवडी जाहीर होताचकार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हा बँकेच्या चौथ्या मजल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. या निवडीसाठी जिल्हा बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी बँकेत आणि बँकेच्या बाहेर गर्दी केली होती. चेअरमन पदासाठी नितीन पाटील आणि व्हाईस चेअरमन पदी अनिल देसाई यांची निवड करण्यात आली. कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दरम्यान, अनिल देसाई यांना लॉटरी लागली तर नितीन काका यांना चेअरमन पद देऊन माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या कार्याचा सन्मान केल्याची चर्चा सुरू होती.

Related Stories

सातारकरांची धडधड वाढली: तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह ; दिवसेंदिवस रुग्णांची सांख्य वाढतेय

Archana Banage

पुसेसावळी दरोडय़ातील फरारी आरोपी जेरबंद

Patil_p

वाढीचा रतीब बंद होईना, मृत्यूदरही घटेना

Patil_p

शहर पोलीसांकडून तीन दुचाकी चोरटय़ांना अटक

Patil_p

बाधित वाढीचा आलेख दोनशेच्या वर

datta jadhav

रविवारी नेहमीप्रमाणे बाधित वाढ कमी

datta jadhav