Tarun Bharat

सातारा : जिल्हा रूग्णालयातील परिचारिकांचे हाेत आहेत हाल

मनुष्य बळ कमी असल्याने कामाचा वाढलाय ताण

प्रतिनिधी / सातारा

जिल्हा रूग्णालयात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे सध्या कार्यरत असलेल्या परिचारिका दररोजच्या कमाच्या वाढत्या ताणामुळे अक्षरश: बेजार झाल्या आहेत. प्रत्येक शिफ्टला तीन परिचारिकांची आवश्यक्ता असताना या ठिकाणी एक परिचारिका संपूर्ण जबाबदारी सांभळत आहे.

जिल्हातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 20 हजारांवर गेलेली आहे. खाजगी रूग्णालयापेक्षा जिल्हा रूग्णालयावर रूग्णांचा भार जास्त आहे. जिल्हा रूग्णालयात सात वॉर्ड व 20 बेडचे दोन अतिदक्षता विभाग कार्यरत आहेत. जेवढी क्षमता आहे. त्यापेक्षा जास्त कोरोना बाधित रूग्ण दररोज दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना केअर सेंटरमध्ये 8 हजार 543 रूग्णांवर उपचार सूरू आहेत. रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी बेड वाढविण्याचे शासनाचे प्रयत्न सूरू आहेत. मात्र, आहे त्या रूग्णांच्या उपचारासाठी परिचारिकांचे मनुष्यबळ कमी पडत आहे.

एका शिफ्टमध्ये एका परिचारिकेला 40 रूग्णांची सेवा बजावावी लागत आहे. दरम्यान, रूग्णांवर उपचार करणार्‍या 19 परिचारिका कोरोनाबाधित आढळल्या आहेत. सर्व रूग्णावर योग्य उपचार करताना अनेकदा त्यांना शारीरिक क्रिया करण्यासाठी ही पूर्ण शिफ्टमध्ये वेळ मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे परिचारिकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. परिचारिकांची ही विदारक अवस्था अनेकदा जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या समोर मांडण्यात आली आहे. परंतु यावर लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.

Related Stories

सातारा : कोरेगावातील गांजा तस्करीचे माळशिरस तालुक्यात उगमस्थान

Archana Banage

सातारकर हादरले; गर्दीला बेक

Patil_p

पावसाळ्यापूर्वी शाळांच्या इमारतींची दुरूस्ती करावी

Patil_p

तपास होत नाही की चोरटे सापडत नाहीत

Patil_p

सातारा : शंभूच्या आयुष्यासाठी मदतीचे आवाहन

datta jadhav

रेवंडे घाटात कोसळली दरड , रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प

Archana Banage