Tarun Bharat

सातारा जिल्ह्याची चिंता वाढली; १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Advertisements

सारीमुळे मृत्यु पावलेल्यांचे अहवाल निगेटिव्ह, बाधित 3 रुग्ण पूर्णपणे बरे, आज सोडणार घरी

सातारा / प्रतिनिधी

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 2, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 8 असे एकूण 12 नागरिकांचा अहवाल कारोना (कोविड-19) बाधित आला आहे. यापैकी 11 निकट सहवासित असून फलटण येथील केअरसेंटर मधील एका महिला आरोग्य सेविकेचा यात समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

मृत्यू झालेल्या दोन नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह

दि. 4 एप्रिल रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मृत्यु झालेल्या 2 सारी सदृष्य नागरिकांचे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने निगेटिव्ह आले असल्याचे कळविले आहे.

बाधित 3 रुग्ण कोरोना मुक्त आज घरी सोडणार

सध्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 3 बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

116 जाणांचे अहवाल निगेटिव्ह

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 48 आणि कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 68 असे एकूण 116 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचेही बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

Related Stories

वाढीचा आलेख सातव्या दिवशीही 100 च्या खाली

Patil_p

आव्हाडांनी अण्णांना दिल्या वाढदिवसाच्या उपरोधिक शुभेच्छा; म्हणाले…

datta jadhav

महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेसाठी प्रशासनाने शड्डू ठोकला

Patil_p

राज्यातील सरपंचांना मिळणार 50 लाखांचे विमा कवच

Patil_p

जिह्यात कोरोना लसीकरणाला वेग

Patil_p

महानगरपालिका, नगरपरिषदांमधील नगरसेवकांची संख्या वाढणार

datta jadhav
error: Content is protected !!