मध्यप्रदेशातील 1200 मजुरांची नोंदणी
सातारा / प्रतिनिधी
कोरोनामुळे प्रत्येकाचे हाल सुरू आहेत.ज्यांच्या हाताचे काम गेले आहे ती मजूर मंडळी आपल्या गावाकडे चालू लागली आहेत.मध्यप्रदेशातील तब्बल 1200 मजुरांनी रेल्वेने जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी केल्याचे समजते. त्यानुसार जिल्ह्यातून पहिली रेल्वे आज सायंकाळी सुटणार असल्याचे परराज्यात जाणाऱ्या येणाऱ्याच्या नोडल अधिकाऱ्यांचे पथकातील सदस्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेक मजूर, कामगार बेकार झाले आहेत. मिळेल त्याने आपल्या गावी जाण्याची सोय हे मजूर करत आहेत. कोणी चालत निघाले, कोणीं खाजगी वाहन करून चालले आहेत. या निघालेल्या कामगारमधून काहींनी रेल्वेची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने रेल्वे वाहतुकीला परवाना मिळतो की नाही यासाठी प्रयत्न सुरू केले होते. रेल्वे करता सोमवारी सायंकाळी परवानगी मिळाल्याचे समजले. खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या समितीच्या अधिकाकाऱ्यांशी संपर्क साधला असता 5 वाजता मध्यप्रदेश येथे जाण्यासाठी रेल्वे आहे. 1200 लोक जाणारआहेत, असे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातून बाहेर राज्यात सोडण्यात येणारी ही पहिलीच रेल्वे आहे.

