Tarun Bharat

सातारा जिल्ह्यातील 464 ग्रामपंचायतींनी केली कोरोनावर मात

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

दिनांक 1: कोविड 19 या विषाणूच्या दुसऱ्या लाटेतील आपत्तीचा सामना करण्यासाठी ग्रामीण स्तरावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार विविध प्रकारच्या उपाययोजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. याचाच परिणाम म्हणून सातारा जिल्ह्यातील 464 ग्रामपंचायती मुक्त झाल्या आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिली.

यामध्ये ग्रामस्तरावर कोमोरबिड रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरविणे, ग्राम दक्षता समितीच्या माध्यमातून गावातील आपत्तीजनक परिस्थितीवर दैनंदिन लक्ष देऊन त्यावर नियंत्रण ठेवणे ,पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती घेऊन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या टेस्ट करून घेणे ग्रहविलगीकरण मध्ये असलेल्या रुग्णांच्या पाठपुरावा करणे, त्याच्या आरोग्याची काळजी घेणे, संस्थात्मक विलगीकरण यामधील रुग्णांची काळजी घेणे ,प्रशासनाने केलेल्या कोरोना नियमांचे पालन करणे, कलम 144 ची यशस्वी अंमलबजावणी करणे इत्यादी उपाय योजना राबवण्यात येत आहेत त्या बरोबरच गाव पातळीवरील ग्राम दक्षता समित्यांनी गावातील पॉझिटिव्ह रुग्णापासून इतरांना संसर्ग होणार नाही यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव गावांमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी असलेल्या मार्गदर्शक पद्धतींचा अवलंब केल्यामुळे जिल्ह्यातील 464 ग्रामपंचायतींना कोरोना विषाणू गावापासून हद्दपार करण्यात यश मिळाले असून ही गावे आज रोजी जिल्ह्यामध्ये कोरोना मुक्त झालेले आहे .

त्यामध्ये सातारा तालुक्यातील 51 कोरेगाव तालुक्यातील खटाव तालुक्यातील एकतीस माण तालुक्यातील बारा फलटण तालुक्यातील सहा खंडाळा तालुक्यातील 11 वाई तालुक्यातील 26 जावली तालुक्यातील 58 महाबळेश्वर तालुक्यातील 52 कराड तालुक्यातील 43 व पाटण तालुक्यातील 144 अशा एकूण 464 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

अशाप्रकारे जिल्ह्यातील इतर गावांनीही या गावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यातून प्रेरित होऊन आपली गावे सुद्धा लवकरच पूर्ण मुक्त करावीत आणि येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटे साठी प्रतिबंधक उपाय योजना राबवून अशाच प्रकारे काम करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करून आपली गावे कोरोना मुक्त करावीत असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जीसी यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना केले आहे.

Related Stories

आजच्या शिक्षण समितीच्या सभेत उमटणार पडसाद

Patil_p

सातारा : कोरेगाव मार्केट कमिटीचे माजी सभापती आनंदराव निकम कालवश

Archana Banage

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी युवकावर गुन्हा

datta jadhav

सातारा जिल्ह्यात 27 जण कोरोना बाधित, 25 जण मुक्त

Archana Banage

सातारा : महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस

Archana Banage

चचेगाव येथे उसाच्या शेताला भीषण आग; 13 एकरावरील ऊस जळून खाक

datta jadhav
error: Content is protected !!