Tarun Bharat

सातारा जिल्ह्यात आज 75 नागरिकांना दिला डिस्चार्ज तर 3 बाधितांचा मृत्यू

प्रतिनिधी / सातारा

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 75 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. 675 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असून तीन बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये जावली तालुक्यातील पुनवडी येथील वय 48, 19, 50, 30, 62, 40, 10, 18, 31, 54, 56 वर्षीय महिला व वय 30, 9, 22, 20, 43, 21, 25 वर्षीय पुरुष, मुनावळे येथील 42 वर्षीय पुरुष., सातारा तालुक्यातील खावली येथील 63 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 65 वर्षीय महिला व 37 व 40 वर्षीय पुरुष, करंडी येथील 43 वर्षीय महिला व 61, 30 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 28, 5, 17, 38 वर्षीय महिला व 25, 15, 45 वर्षीय पुरुष, कारंदवाडी येथील 23 वर्षीय महिला, नागठाणे येथील 43 वर्षीय महिला, खिंडवाडी येथील 44 वर्षीय पुरुष, वावदरे येथील 30 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 26 वर्षीय महिला.

कराड तालुक्यातील किवळ येथील 36 वर्षीय पुरुष, बेलावडे येथील 31 वर्षीय महिला, चचेगाव येथील 42 वर्षीय महिला, चरेगाव येथील 38 वर्षीय पुरुष.,

वाई तालुक्यातील परखंदी येथील 45, 68 वर्षीय पुरुष, बावधन येथील 28 वर्षीय पुरुष, आसले येथील 24 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय महिला, बदेवाडी येथील 65, 35, 11, 40 वर्षीय महिला व 8, 25 वर्षीय पुरुष, गंगापुरी येथील 48 वर्षीय महिला व 12 वर्षीय मुलगी, नवेचीवाडी येथील 21 वर्षीय युवक, फुलेनगर येथील 32, 26, 28 वर्षीय पुरुष व 24, 39, 50 वर्षीय महिला.,

खटाव तालुक्यातील निमसोड येथील 19 वर्षीय युवती.,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील कुंभार आळीतील 28 वर्षीय पुरुष, बाजारपेठेतील 32 वर्षीय पुरुष, रामोशी आळी येथील 30, 15, 17, 37 वर्षीय महिला, ग्रामपंचायत येथील 53 वर्षीय पुरुष.,

पाटण तालुक्यातील कासाणी येथील 60 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला, तारळे येथील 34 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष, सुर्यवंशीवाडी येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कण्हेर ता. सातारा येथील 77 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच सातारा येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये वाघोली ता. कोरेगाव येथील 80 वर्षीय पुरुष व अंगापूर ता. सातारा येथील 35 वर्षीय महिला या दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दोघांना श्वसनसंस्थेचा तीव्र जंतु संसर्गाची लक्षणे असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोघांचेही खाजगी प्रयोगशाळेतील अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.

675 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 31, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 62, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 35, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 36, वाई येथील 73, शिरवळ येथील 49, रायगाव येथील 73, पानमळेवाडी येथील 146, मायणी येथील 24, महाबळेश्वर येथे 8, पाटण येथील 48, खावली येथील 30 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 60 असे एकूण 675 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
घेतलेले एकूण नमुने 24924
एकूण बाधित 2975
घरी सोडण्यात आलेले 1678
मृत्यू 106
उपचारार्थ रुग्ण 1191

Related Stories

अमरावती जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून कडक लॉकडाऊन : जिल्हाधिकारी

Tousif Mujawar

पुणे, मुंबईकरांनी वाढवली जिल्हय़ाची चिंता

Patil_p

सीपीआरची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास कटिबद्ध – राजेश क्षीरसागर

Archana Banage

राज्यातील १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव

Archana Banage

शिक्षण विभागाचा विद्यार्थ्यांना आधार

Patil_p

माणदेशी फाऊंडेशनचे काम कौतुकास्पद

Patil_p