Tarun Bharat

सातारा जिल्ह्यात आज 753 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज

सातारा / प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 753 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 917 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

917 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 12, उपजिल्हा रुग्णालय कराड 14, उपजिल्हा रुग्णालय फलटण 54, कोरेगाव 128, वाई 80, खंडाळा 110, रायगांव 78, पानमळेवाडी 126, मायणी 19, महाबळेश्वर 40, दहिवडी 30, खावली 45, व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 181 असे एकूण 917 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने — 48264
एकूण बाधित — 16788
घरी सोडण्यात आलेले — 9774
मृत्यू — 462
उपचारार्थ रुग्ण — 6552

Related Stories

सप्टेंबर महिन्यात सातारा शहर सावरले

datta jadhav

Satara : मादी बिबट्या तीनपैकी एका बछड्याला घेऊन गेली; दोन अजूनही ऊसाच्या शेतात

Abhijeet Khandekar

सातारा जिल्हा लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा

Patil_p

कराड तालुक्यातील चौघे कोरोनामुक्त

Archana Banage

गोडोलीत चौपाटी झालीचं पाहिजे

Patil_p

अखेर पालिका कर्मचाऱयांना 17 हजार सानुग्रह अनुदान मंजूर

Omkar B