Tarun Bharat

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ ; १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Advertisements

तर त्यातील एक मृत्यू पश्चात अहवाल पॉझिटिव्ह

सातारा/प्रतिनिधी

महाबळेवर तालुक्यातील कुरोशी येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तसेच खटाव तालुक्यातील निढळ येथील 20 वर्षीय गरोदर स्त्रीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील वडाळे येथील 40 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 1 वर्षीय बालक, 89 व 30 वर्षीय पुरुष, बरड येथील 23 व 26 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील निढळ येथील 20 वर्षीय महिला, महाबळेश्वर तालुक्यातील कुरोशी येथील 55 वर्षीय पुरुष (मृत) या व्यक्तिने गळपास घेवून काल आत्महत्या केलेली होती. मृत्यू पश्चात त्याच्या स्त्रावाचे नमुने घेतले होते त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

वाई तालुक्यातील आसरे येथील 55 वर्षीय पुरुष
जावली तालुक्यातील ओझरे येथील 5 वर्षाची मुलगी, 34 वर्षीय पुरुष व 25 वर्षाची महिला यांचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 703 रुग्ण आढळले आहेत. 448 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये 223 जणांवर उपचार सुरु असून 30 जणांचा मृत्यु झालेला आहे.

Related Stories

बनावट कागदपत्राद्वारे 13 कोटींची फसवणूक

Patil_p

पुणे विभागातील भाजपाची मक्तेदारी मोडून काढूया – ना. बाळासाहेब पाटील

Archana Banage

“राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना?”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Archana Banage

नवदुर्गा निघाल्या साडेतीन शक्ती पीठाच्या दर्शनाला

Archana Banage

मान्सूनची महाराष्ट्रातून एक्झिट

datta jadhav

लाटाप्रिय लोकांना फुटलं रडू

datta jadhav
error: Content is protected !!