Tarun Bharat

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा ७ वर

Advertisements

प्रतिनिधी /सातारा
शुक्रवारी जिल्ह्यातील वातावरण दिलासादायक असतानाच रात्री उशिरा जिल्ह्यातील आणखी एका अनुमानाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने स्थिती गंभीर होऊ लागली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाचा निकट सहवासित 19 वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात अनुमानित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. या युवकाच्या घशातील स्त्रावाचे नमुना रिपोर्ट हा कोरोना (कोव्हीड -19) पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले आहे. त्यामुळे हा युवक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या रुग्णांवर मार्गदर्शक सुचनानुसार कोरोना संसर्गाचे उपचार चालू आहेत. शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 20 व कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या 44 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याने प्रशासनासह सर्वांचा जीव भांडयात पडला आहे. मात्र, 33 नवीन अनुमानित दाखल झाले असून यामध्ये सातारा जिल्हा रुग्णालयात 20 तर तर फलटण उपजिल्हा रुग्णालयात 13 अनुमानितांना दाखल करण्यात आले असून या सर्वाचे स्वॅब पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले असून या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन कठोर प्रयत्न करत असून जिल्हय़ातील सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळावेत, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.
जावली तालुक्यातील निझरे 2 व कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथे एक बाधित रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली. या गावातील बाधितांच्या सहवासात आलेल्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून त्यांच्या ट्रव्हल हिस्ट्रीनुसार आरोग्य विभाग युध्द पातळीवर काम करत आहे. कोल्हापूरातील बाधित महिला फलटणमध्ये येवून गेल्याने तिच्या ट्रव्हल हिस्ट्रीनुसार फलटण उपजिल्हा रुग्णालयात 13 अनुमानितांना दाखल करण्यात आले आहे.
सातारा जिल्हा रुग्णालय व कृष्णा मेडिकल हॉस्पिटल येथे सातारा जिह्यातील कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवातील तसेच श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे अशा विविध आजारांमुळे 64 अनुमानित रुणांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या 64 अनुमानित रुग्णांच्या घाशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्व 64 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. यामध्ये सातारा जिल्हा रुग्णालयातील 12 पुरुष व 8 महिलांचा तर कृष्णा मेडिकल हॉस्पिटलमधील 16 महिला व 7 महिन्याच्या बालिकेचा आणि 27 पुरुषांचा समावेश आहे.
दरम्यान, गुरुवार, दि. 9 एप्रिल रोजी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालय सातारा येथे 15 ते 20 वयोगटातील बारा पुरुषांना कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर शुक्रवारी सातारा परदेश प्रवास करुन आलेला 22 वर्षीय युवकास सर्दी व खोकला असल्याने तसेच मुंबई व इतर राज्यात प्रवास करुन आलेले 32 ते 51 वयोगटातील 6 पुरुष व 1 महिला यांना ताप, सर्दी व खोकला श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर कोरोना अनुमानित रुग्ण तसेच फलटण उप जिल्हा रुग्णालयात 3 ते 90 वर्ष वयोगटातील तेरा जणांना (6 पुरुष व 7 महिला) कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व 25 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दिनांक 10 रोजीची सायं- 5 वाजताची
सातारा जिल्हा करोना आकडेवारी
1.जिल्हा शासकीय रुग्णालय-197
2.कृष्णा हॉस्पीटल, कराड-163
3.खाजगी हॉस्पीटल-4
4.एकूण दाखल -364
प्रवासी-86, निकट सहवासीत-225,
श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-53 एकूण 364
5.14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-4
6.कोरोना नमुने घेतलेले एकूण- 368
7.कोरोना बाधित अहवाल -6
8.कोरोना अबाधित अहवाल -308
9.अहवाल प्रलंबित -50
10.डिस्चार्ज दिलेले- 309
11.मृत्यू 1
12.सद्यस्थितीत दाखल-54
13.आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 9.4.2020) -812
14.होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -812
15.होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -533
16.होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती ा279
17.संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-126
18.आज दाखल 8
19.यापैकी डिस्जार्ज केलेले-71
20.यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-13
21.अद्याप दाखल- 55

Related Stories

अवैध धंद्याच्या विरोधात एक लाख सह्यांचे निवेदन देणार राज्यपालांना : कॉ. आडम मास्तर

Archana Banage

…अपघात अटळ आहे

datta jadhav

पुण्यात कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती, बाळ कोरोनामुक्त

prashant_c

‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती हवी का?, सामना कार्यालयाबाहेर मनसेची पोस्टरबाजी

datta jadhav

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED चे समन्स

Archana Banage

घाईघाईने निर्बंध शिथिल करून धोका पत्करू नका : उद्धव ठाकरे

Tousif Mujawar
error: Content is protected !!