Tarun Bharat

सातारा जिल्ह्यात नव्याने दहा जण बाधित

Advertisements

अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 28 फेब्रुवारी 2022, सकाळी 11.30

● पाटण, फलटण, जावली, सातारा हे चार तालुके निरंक
● सक्रिय रुग्ण दीडशेच्या आत
● सहा तालुक्यामध्ये प्रत्येकी नव्याने एक बाधित
● रिकव्हरी रेट 97.30 वर

प्रतिनिधी / सातारा :

जिल्ह्यात नव्याने होणारी बाधितवाढ आता दिवसेंदिवस कमी होत असून, जिल्हा पूर्णपणे शुन्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सातारा तालुक्यात प्रथमच नव्याने बाधित निरंक आहे. त्याच बरोबरच पाटण, फलटण आणि जावली याही तालुक्यांचा समावेश आहे. काल दिवसभरात 475 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले त्यापैकी 10 जण केवळ नव्याने बाधित आढळून आले. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 2.11 वर आलेला आहे. रिकव्हरी रेट 97.30 वर आलेला आहे. सक्रिय रुग्ण दिडशेच्या आतमध्ये आहेत.

सातारा तालुक्यात प्रथमच निरंक

सातारा तालुका हा कोरोना रुग्णवाढीत सुरुवातीपासून पुढे राहिला होता. सातारा तालुक्यातील कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी सेवानिवृत्ती असूनही सेवानिवृत्ती घेतली नव्हती. कोरोना काळात ते निस्पृह भावनेन काम करत राहिले. त्यांच्यावर राजकीय पदाधिकाऱ्यांनी अनेकदा बर्डींग आणले. परंतु त्यांनी सातारा तालुक्यामध्ये कोरोना बाधित कमी कसे आढळून येतील. आढळून येणाऱ्यांवर चांगले उपचार कसे होतील याकरता प्रयत्न केले. जास्तीत जास्त लसीकरण करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी ज्यांच्यावर काही काळ कोरोना सेंटरची जबाबदारी सोपवली होती. ते डॉ. कारखानिस यांचा मात्र कोरोनाने बळी घेतला. सातारा तालुक्यातील आरोग्य विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत चांगले काम केले. आज सकाळी जाहीर झालेल्या अहवालात प्रथमच सातारा तालुक्यामध्ये कोणीही नव्याने बाधित आढळून आले नाही. आतापर्यंत सातारा तालुक्यात 60 हजार 218 जण बाधित झालेले आहेत. त्याच बरोबर पाटण, फलटण, जावली याही तालुक्यात नव्याने कोणीही बाधित आढळून आले नाही. त्याही तालुक्यामध्ये आतापर्यंत पाटण तालुक्यामदये 11 हजार 250 बाधित झाले. फलटण तालुक्यात 40 हजार 614 जण आतापर्यंत बाधित झाले तर जावली तालुक्यामध्ये 10 हजार 664 जण आतापर्यंत बाधित झाले. तसेच कराड तालुक्यामध्ये 3 तर आतापर्यंत 44 हजार 552 जण बाधित झाले. खंडाळा तालुक्यात 1 तर आतापर्यंत 15 हजार 905, खटाव तालुक्यात 1 तर आतापर्यंत 27 हजार 920, कोरेगाव तालुक्यात 1 तर आतापर्यंत 23 हजार 633, माण तालुक्यात 1 तर आतापर्यंत 19 हजार 271, महाबळेश्वर तालुक्यात 1 तर आतापर्यंत 5364, वाई तालुक्यात 1 तर आतापर्यंत 17 हजार 528 जण झालेले आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरात 10 जण बाधित आढळून आले आहेत.

सक्रिय रुग्ण 150 च्या आत

बरे होणाऱ्यांची संख्या चांगली आहे. जे बाधित आढळून येत आहेत. त्यांच्यावर चांगले उपचार होत आहेत. ते बरे होवून घरी जात आहेत. सध्या जिल्ह्यात सक्रीय रुग्ण 150 च्या आतमध्ये असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे 40 च्या आतमध्ये आहेत. त्यातील एखाद्या रुग्णाची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट 97.30 च्या आसपास आहे.

सोमवारी
नमूने – 475
बाधित – 10

सोमवारपर्यंत
नमूने -25,51,852
बाधित-2,79,020
मुक्त-2,71,481
मृत्यू-6,675

Related Stories

पांगारे येथे बछडय़ासह बिबटय़ा मादीचे दर्शन

Patil_p

सातारा : खड्डे भरत नागरिकांनी नोंदवला पालिकेचा निषेध

Archana Banage

साताऱयात पायलट प्रयोग राबविण्याची मागणी

Patil_p

पाचवडमध्ये 10 तोळे सोने व 43 हजारांची रोख रकमेची चोरी

Patil_p

टपरीधारकांचा मनमानी कारभार

Amit Kulkarni

निर्बंधांची वेळ येण्यापेक्षा नियम पाळा

Patil_p
error: Content is protected !!