Tarun Bharat

सातारा जिल्ह्यात पुन्हा टाळेबंदी

● “तरुण भारत”च्या भूमिकेवर शिक्कामोर्तब
● शुक्रवार 17 ते 22 पूर्ण लॉक डाऊन
● बुधवार 23 ते 26 अंशतः लॉक डाऊन
● “तरुण भारत”च्या आग्रही भूमिकेचा विजय झाल्याच्या सर्वत्र उमटल्या प्रतिक्रिया
● कोरोना ला रोखण्यावर निर्वाणीचा उपाय

सातारा/प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात पुन्हा टाळेबंदी घोषित झाली आहे. शुक्रवार 17 ते 22 पर्यंत पूर्ण तर 23 ते 26 अंशतः लॉक डाऊन जाहीर झाला आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा डब्लिंग रेट सध्या मुंबई-पुण्या पेक्षा जास्त झाल्याचे वास्तव “तरुण भारत”ने मांडत “पूर्ण लॉकडाऊन” ची प्रखर भूमिका सातत्याने मांडली होती. मंगळवारी जिल्हा प्रशासनाने मॅरेथॉन बैठक घेऊन “तरुण भारत”च्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, जनजीवनाची अडकलेली चाकं बाहेर आलीच पाहिजेत पण त्याआधी कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठीचे हे प्रयोजन आहे.

दरम्यान, लॉक डाऊनच्या भीतीपोटी बुधवार-गुरुवारी गर्दी करणाऱ्यांना पोलीस कोठडीची हवा देण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक पावले उचलण्याची गरज आहे. पूर्ण जिल्हाकडेकोट बंद होणार आहे.

अत्यावश्यक सेवाही बंदच राहणार
या आदेशानुसार सातारा जिह्यातील सर्व किराणा दुकाने सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, इतर व्यवसाय करणारी दुकाने 17 जुलैच्या रात्री बारा वाजल्यापासून 26 जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहेत.

अंशतः म्हणजे सकाळी 9 ते 2 वेळेत फक्त आवश्यक सेवा सुरू
याशिवाय 22 ते 26 जुलै या कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळी केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने व होलसेल विक्रेते यांची दुकाने सुरू राहतील. याशिवाय इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

हॉटेल, लॉज, दारू पूर्णतः बंद म्हणजे बंद

या कालावधीत उपहारगृहे, बिअर शॉपी, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, बाजार, मार्केट पूर्ण बंद राहणार आहे. वाईन शॉप, बियर शॉपी, देशी दारूची दुकाने तसेच मद्याची घरपोच सेवा 17 ते 22 या दरम्यान बंद राहणार असून 22 ते 26 या कालावधीत केवळ घरपोच सुविधा देण्यास संमती देण्यात आली आहे. तर हॉटेलची घरपोच सेवा 17 ते 22 मत या दरम्यान पूर्ण बंद राहणार असून 22 ते 26 या कालावधीत किंवा घरपोच सेवा सुरू राहणार आहे.

Related Stories

सातारा जिल्ह्यात दहा जणांची कोरोनावर मात : 2 बाधित

Archana Banage

सोलापुरात एक लाख नागरिकांची रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करणार – पालकमंत्री

Archana Banage

अनिल देशमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे ट्विटच्या माध्यमातून केली ‘ही’ मागणी

Archana Banage

काम दाखवा न्हायतर टपल्याच बसतील

datta jadhav

हद्दवाढ भागाच्या विकासाला कधी सापडणार मुहूर्त

Patil_p

पोलिस प्रशासनाला शिक्षकांचे पाठबळ

Patil_p