Tarun Bharat

सातारा जिल्ह्यात आणखीन ३६ जण पॉझिटिव्ह तर १९१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

प्रतिनिधी / सातारा

विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील ३६ नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. काल शनिवारी जिल्ह्यात ४७ रूग्णांची भर पडली होती तर आज आणखीन ३६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सातारकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

यामध्ये कराड तालुक्यातील खूबी येथील १९ वर्षीय युवक, रेठरे खुर्द. येथील 21 वर्षीय महिला, तारुख येथील 60 वर्षीय महिला. पाटण तालुक्यातील सितापवाडी 60 व 28 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील खांडेवाडी वारुडगड येथील 33 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील येळीव येथील 76 वर्षीय महिला व 24, 26 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील बनवडी 39 वर्षीय पुरुष, सासपडे येथील 23 वर्षीय पुरुष, किरोली येथील 26 व28 वर्षीय पुरुष, नागझरी येथील 28 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील रामवाडी येथील 48 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 11 वर्षाचा मुलगा, 22 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक, 18 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, धोंडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष सातारा तालुक्यातील गोडोली येथील 55 वर्षीय पुरुष, जिहे येथील 50 वर्षीय महिला, चंदननगर कोडोली येथील 39 वर्षीय महिला, धावली येथील 26 वर्षीय पुरुष, बोरगाव येथील 31 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 60 वर्षीय महिला व शहाजी चौक येथील 20 व 42 वर्षीय पुरुष, वाई सह्याद्रीनगर येथील 30 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

एक रुग्ण हा पुणे येथे स्थायिक असल्याने त्याची गणना जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत केलेली नाही. 191जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
एन. सी. सी. एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांनी 191 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही कळविले आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

Related Stories

दिल्ली : सोमवारपासून पूर्ण वेळ सुरू राहणार बाजार; हटविण्यात आले सर्व निर्बंध

Tousif Mujawar

याला म्हणतात निष्ठावाण ! कोल्हापूरच्या शिवसैनिकानं रक्तानं पत्र लिहून उद्धव ठाकरेंना दिला पाठिंबा

Abhijeet Khandekar

Rahul Gandhi : गुजरातच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो,राहुल गांधी

Archana Banage

सिमल्यातील सफरचंदांची पहिल्यांदाच होणार ऑनलाइन विक्री, कृषी उत्पन्न समितीचा निर्णय

Tousif Mujawar

सातारा पोलीस दलात जम्बो बदल्या

Patil_p

जगभरात 1.11 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav