Tarun Bharat

सातारा जिल्ह्यात 27 जण कोरोना बाधित, 25 जण मुक्त

Advertisements

सातारा, प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात सोमवारी 27 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून 25 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. जिल्हय़ात जे कोरोना बाधित आढळून येत आहेत त्यामध्ये बहुतेक प्रवास हिस्ट्री असलेले रुग्ण असून ते मुंबई, पुणे, अहमदाबाद शहरातून आलेले आहेत. स्थानिक बाधित होण्याचे प्रमाण नगण्य होते मात्र गेल्या आठवडय़ात त्यात वाढ झाली आहे. मात्र याचे कारण होमक्वारंटाईनचे नियम 100 टक्के पाळत नसल्याचे समोर आले आहे.

सोमवारी 25 जणांना सोडले घरी
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय 1, कोविड केअर फलटण येथील 2, कृष्णा मेडीकल कॉलेज 8, बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी येथील 6, कोविड केअर केंद्र खावली येथील 6, कोविड केअर केंद्र वाई येथील 1, कोविड केअर केंद्र ब्रम्हपुरी येथील 1 असे एकूण 25 रुगणांना सोमवारी 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये
कराड तालुक्यातील वडगांव (उंब्रज) येथील 86 वर्षीय पुरुष, , तुळसण येथील 51, 50 व 35 वर्षीय पुरुष, केसे येथील 64 वर्षीय पुरुष,
पाटण तालुक्यातील उरुल येथील 26 वर्षीय पुरुष,जांभेकरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, नवसारी येथील 55 वर्षीय पुरुष. बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी येथील
जावली तालुक्यातील भणंग येथील 24 वर्षीय युवती व 21 वर्षीय युवक,ओझरे येथील 5 वर्षीची बालिका, 25 वर्षीय महिला व 34 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. धोंडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष. कोविड केअर केंद्र, ब्रम्हपुरी येथील
कोरेगाव तालुक्यातील साप येथील 39 वर्षीय पुरुष.
वाई तालुक्यातील बावधन नाका येथील 25 वर्षीय पुरुष.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे दाखल असणाऱ्यांमध्ये
जावली तालुक्यातील धोंडेवाडी येथील 57 वषीय पुरुष. खावली येथे दाखल असणाऱ्यांमध्ये
सातारा तालुक्यातील समर्थ नगर येथील 19 वर्षीय युवक, देगाव येथील 55 वर्षीय पुरुष,शाहुपुरी येथील 58 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 23 वर्षीय महिला 8 वर्षीय मुलगी, सैदापूर येथील 37 वर्षीय पुरुष. फलटण येथे दाखल असणाऱ्यांमध्ये
फलटण तालुक्यातील वडले येथील 24 व 52 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

27 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह
जावली
गांजे येथील 24 वर्षीय पुरुष. म्हाते खुर्द येथील 38 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा.
कराड
तारुख येथील 20 वर्षीय 2 पुरुष व 24 वर्षीय पुरुष. फलटण रविवार पेठ येथील 3 वर्षीय बालक व जोर गाव येथील 26 वर्षीय महिला.
खटाव
शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40 व 56 वर्षीय पुरुष व 2 वर्षाचे बालक, म्हासूर्णे 18 वर्षीय तरुणी.
सातारा
क्षेत्र माहुली येथील 49 वर्षीय 2 महिला व 16 वर्षीय तरुण.
कोरेगाव
नायगाव येथील 44 वर्षीय पुरुष. कराड तालुक्यात कोयना वसाहत येथे 40 वर्षीय पुरुष.

पाटण तालुक्यात एकाच दिवसात 8 बाधित
पाटण येथील गोवारे येथील 40 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगी, हवालेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 21 वर्षीय महिला, बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष. आचरेवाडीतील 38 वर्षीय पुरुष.

171 जणांचा अहवाल आला निगेटिव्ह
काल रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांचेकडून 171 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडेकर यांनी सांगितले.

248 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय 17, कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथील 30, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 77, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 2, शिरवळ येथील 12, पानमळेवाडी येथील 16, मायणी येथील16, महाबळेश्वर येथील5, पाटण येथील24, दहिवडी येथील 49 असे एकूण 248 जणांच्या नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

कम्युनिटी संसर्ग टाळण्यासाठी सतर्क रहा
जिल्हय़ात बाहेरुन आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिटय़ुशनल क्वारंटाईन केले जात आहे. यामध्ये होमक्वारंटाईन असलेल्या नागरिकांना भेटण्यासाठी जे गेले त्यातील काही स्थानिक बाधित म्हणून समोर आलेले आहेत. त्यामुळे क्वारंटाईन असलेल्या नागरिकांनी शिस्त, नियम काटेकोरपणे पाळण्याची गरज असून त्यासाठी ग्रामस्तरीय समित्या प्रयत्न करत आहेत. शिस्त, नियम न पाळल्यास कम्युनिटी संसर्गाची भीती असून तो टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची गरज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केली.

कोव्हिड योध्दांचे अभिनंदन
होम कोरंटाईन असलेल्या सर्वांनी प्रशासनाचे नियम पाळून कम्युनिटी संसर्गापासून जिल्हय़ाला वाचवयाचे असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी करतानाच कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी झटत असलेल्या जिल्हय़ातील सर्व सरकारी, खासगी डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, महसूल विभागासह पोलीस कोव्हिड योध्दांचे जाहीरपणे अभिनंदन केले. या सर्वांमुळे आपण जिल्हय़ाची परिस्थिती नियंत्रणाखाली आणत असल्याचे सांगून सिंह यांनी जिल्हावासियांच्यावतीने या सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

जिल्हय़ात सोमवारपर्यंत
एकूण बाधित 845
एकूण मुक्त 668
बळी 39
सोमवारी
एकूण बाधित 27
एकूण मुक्त 25
बळी 00

Related Stories

दरोड्यातील आरोपीस कवठेमहांकाळ मध्ये अटक

Abhijeet Shinde

सातारा जिल्हा परिषदेचे कर्मचारी देणार 55 व्हेटींलेटर बेड

Abhijeet Shinde

पालिका कर्मचाऱयांची दिवाळी झाली गोड

Patil_p

देवेंद्र आहेत ते… भ्रष्टाचाऱ्यांनो लवकरच तुमचा बाजार उठवणार

datta jadhav

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांबरोबर आज महत्वपूर्ण बैठक

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात 893 नागरिकांना दिला डिस्चार्ज

Abhijeet Shinde
error: Content is protected !!