Tarun Bharat

सातारा जिल्ह्यात 322 जण कोरोनामुक्त, 682 जणांचे नमुने तपासणीला

प्रतिनिधी/सातारा

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 322 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 682 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 18, कराड तालुक्यातील 42, खंडाळा तालुक्यातील 3, खटाव तालुक्यातील 12, कोरेगांव तालुक्यातील 11, महाबळेश्वर तालुक्यातील 6, माण तालुक्यातील 10, पाटण तालुक्यातील 28, सातारा तालुक्यातील 164, वाई तालुक्यातील 28 असे एकूण 322 नागरिकांचा समावेश आहे.

682 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 18, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 71, फलटण 39, कोरेगांव 34, वाई 44, खंडाळा 75, रायगांव 32, पानमळेवाडी 85, मायणी 61, महाबळेश्वर 60, दहिवडी 8, खावली 25 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 130 असे एकूण 682 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने — 44123
एकूण बाधित — 12888
घरी सोडण्यात आलेले — 7109
मृत्यू — 371
उपचारार्थ रुग्ण — 5408

Related Stories

प्रतापगड भागात आढळला बारा फूट लांबीचा अजगर

Patil_p

सातारा : गौरी आणि घरगुती बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात

Archana Banage

शिंदीकरांची जमीन गेली चोरीला!

datta jadhav

मलकापुरात दुचाकी अपघातानंतर तणाव

Patil_p

सातारा : महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस

Archana Banage

सातारकरांना टोलमाफी मिळालीच पाहिजे

Patil_p