Tarun Bharat

सातारा जिल्ह्यात 373 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 373 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 942 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 30, कराड तालुक्यातील 82, खंडाळा 27, खटाव तालुक्यातील 9, कोरेगाव 12, महाबळेश्वर तालुक्यातील 4, माण तालुक्यातील 17, पाटण तालुक्यातील 9, फलटण तालुक्यातील 4, सातारा तालुक्यातील 148 व वाई तालुक्यातील 31 असे एकूण 373 नागरिकांचा समावेश आहे.

942 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय कराड 169, उपजिल्हा रुग्णालय फलटण 34, कोरेगाव 96, वाई 32, खंडाळा 99, रायगांव 68, पानमळेवाडी 54, मायणी 104, महाबळेश्वर 42, पाटण 11, दहिवडी 28, खावली 50, व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 139 असे एकूण 942 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने — 46665
एकूण बाधित — 15247
घरी सोडण्यात आलेले — 8151
मृत्यू — 414
उपचारार्थ रुग्ण — 6666

Related Stories

सेवा रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई सुरू

Patil_p

राज्यातील सरपंचांना मिळणार 50 लाखांचे विमा कवच

Patil_p

अजिंक्यपदासाठी उद्या साताऱ्यात महिला कुस्तीगीर भिडणार!

datta jadhav

सातारा शहर भाजपाने नाना पटोले यांच्या प्रतिमेला मारले जोडे

Patil_p

बलात्कार पिडितेला न्याय द्या…

Patil_p

सातारा : महिला तक्रारींचे होणार ऑनलाईन निराकरण

Archana Banage
error: Content is protected !!