Tarun Bharat

सातारा जिल्ह्याला कोरोनाचा विळखा घट्ट, 31 बाधित

हादरलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊन पुन्हा चर्चेत
● शनिवार व रविवार दोन दिवसात 118 रुग्ण
● सहा कैद्यांची कोरोना वर मात
● जिल्ह्याचा आकडा तीनशे पार
● सर्वच तालुक्यांत शिरकाव

प्रतिनिधी/सातारा

मार्च महिन्यापासून सुरु असलेल्या कोरोना विरुध्दच्या लढाईत 23 व 24 मे हे दिवस सगळय़ा जिल्हय़ाच्या उरात धडकी भरवणारे ठरले. शनिवारी एका दिवसात तब्बल 77 व रविवारी 31 असा कोरोना बाधितांचा आकडा 118 ने वाढला. त्यामुळे जिल्हय़ाची एकूण संख्या आता 309 झाली आहे. सलग दोन दिवसांच्या धक्क्यानी चिंतेचा भार वाढला आहे. संक्रमण रोखण्यासाठी शिथिल झालेला लॉक डाऊन पुन्हा वाढणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. हॉट स्पॉट कराड तालुक्यात या चर्चेने जोर धरला आहे. काही भागात अफवाही होत्या.

6 बाधित कैद्यांची कोरोनावर मात

पुण्याच्या येरवडा कारागृहातून 45 कैदी सातारा कारागृहात हलवण्यात आले होते. त्यापैकी दहा जणांना कोणाची बाधा झाली होती. मात्र यातील दोघानी यापूर्वीच कोरोनावर मात केली आहे. रविवारी आणखी सहा कैद्यांनी ही लढाई जिंकली. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले अजून दोन कैदी उपचारात आहेत. मात्र त्यांचीही या दिशेने वाटचाल सुरु असून जिल्हा कारागृह पूर्ण मुक्त होण्याच्या वाटेवर आहे. क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे जिल्हा कारागृहातील सहा कैदी कोविड बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.

67 जण विलगिकरण कक्षात दाखल

तसेच क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे 29, ग्रामीण रुग्णालय वाई येथे 38 असे एकूण 67 जणांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन. सी. सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. आमोद गडीकर यांनी रविवारी दुपारी कळविले आहे.

जिल्ह्याला भरली धडकी

गेल्या दोन तीन दिवसात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी जिल्हय़ाने कोरोनामुक्तीत शंभरी पार करुन पुढे वाटचाल सुरु केली होती. तोपर्यंत शासनाच्या नवीन निकषांनुसार मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करुन लॉकडाऊनच्या चौथ्या सत्रात शिथीलता देण्याचे आदेश निघत होते. अत्यावश्यक सेवेबरोबर बऱयापैकी सर्वच दुकाने जिल्हय़ात उघडू लागली असताना आणि कराड तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना शनिवार व रविवारी पाठोपाठ येवू लागलेल्या कोरोना बाधितांच्या अहवालाने दोन दिवसांत जिल्हय़ाच्या उरात धडकी भरवली आहे.

लॉक डाऊन वाढवा

दोन दिवसांत 118 कोरोना बाधित समोर आल्यावर सगळय़ांच्या झोपा उडाल्या असून बाधितांमध्ये विशेषत पुणे, मुंबईकरांचा असलेला समावेश आणि जिल्हय़ात मोठय़ा संख्येने दाखल झालेल्या पुणे, मुंबईकरांचे आव्हान आता आरोग्य प्रशासनाला पेलावे लागणार आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी सुविधा निर्माण करण्याबरोबरच पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. याबरोबरच पोलीस दल, महसूल खाते, आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षकांवरील जबाबदारी वाढली असून आता एकीकडे वाढलेल्या कोरोना बाधितांचे संकट तर होवू लागलेल्या गर्दीचे संकटही जिल्हय़ावर घोघांवत आहे. त्यामुळे आता पुन्हा लॉक डाऊन करावा, असे जनमानसात बोलले जात आहे.

कोरोनाने सर्व तालुक्यात पसरले पाय

मुंबई व पुण्याहून आलेले नागरिक बाधित होत असल्याने चिंता वाढली असून रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार कोरोनाने जिल्हय़ातील सर्व तालुक्यात पाय पसरले आहेत. सुरुवातीला कराड, सातारा, कोरेगाव तालुक्यात असणारी रुग्नसंख्या आता सर्व तालुक्यांमध्ये पसरली आहे. त्यामुळे प्रशासनासमोरचा ताण वाढला आहे.

26 जण विलगिकरण कक्षात दाखल

काल दि. 23 मे राजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथे 26 जणांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन. सी. सी. एस. पुणा यांच्याकडे तपासणी पाठविण्यात आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.

जिल्हय़ाची आकडेवारी

कोरोना बाधितांची एकूण संख्या- 309
कोरोनामुक्तांची संख्या 119
कोरोना बळी संख्या 7

रविवारी सायंकाळी सात पर्यंतची आकडेवारी

( रविवारी यात 31 रुग्ण वाढले आहेत, मात्र यांची गावे शासनाने अधिकृत कळवली नाहीत.)
सातारा तालुका 42
कराड तालुका 132
कोरेगाव तालुका 11
जावली तालुका 13
महाबळेश्वर तालुका 1
वाई तालुका 4
खंडाळा तालुका 14
खटाव तालुका 19
माण तालुका 5
फलटण तालुका 12
पाटण तालुका 25


Related Stories

डेंग्यू नियंत्रणासाठी केंद्राची पथके रवाना

datta jadhav

ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी मनसे करणार ‘हॉर्न वाजवा’ आंदोलन

Tousif Mujawar

कृषीपंपांना सवलतीच्या दरात वीज- शासनाचा निर्णय

Abhijeet Khandekar

रेपो रेटमध्ये वाढ; कर्ज महागणार

Archana Banage

काँग्रेसला द्रमुकने दिला झटका

Patil_p

रयतच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

Patil_p